न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू नॅथन ॲस्टल हा स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जायचा. एक ‘फायटर क्रिकेटपटू’ अशी ओळख असलेला नॅथनने आपल्या कारकीर्दीत झंझावती खेळी करत संघाला अनेक सामने जिंकून दिले. जगातल्या गोलंदाजांवर हवाई हल्ले चढवणारा न्यूझीलंडचा हा क्रिकेटपटू निवृत्तीनंतर कार रेसर बनला आहे.
कार रेसिंग हा खेळ धोकादायक मानला जातो. यात कधी कुणाचा जीव जाईल हे सांगता येत नाही. कुटुंब चालवण्यासाठी जिवावर बेतणारा हा खेळ तो खेळत आहे. 2007 क्रिकेटमधून निवृत्त झाला. तेव्हापासून तो हा खेळ खेळत आहे.
नॅथन अॅस्टलने आपल्या कारकिर्दीत भारतीय गोलंदाजांना खूप सतावले. भारताविरोधात नेहमी जिद्दीने खेळायचा. आपली विकेट त्याने भारतीय गोलंदाजांना कधीच सहज दिली नाही. भारताविरुद्ध त्याने 29 वनडे सामने खेळला असून त्यात त्याने 5 शतके आणि 5 अर्धशतके ठोकली आहेत. तसेच भारताविरुद्ध एकही कसोटी शतकही केले आहे.
नथन अॅस्टलने 18 वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वात वेगवान द्विशतक खेळी केली होती. त्याने 153 चेंडूत द्विशतकी खेळी साकारली होती. सर्वात कमी चेंडूत द्विशतक ठोकण्याचा विक्रम त्याने केला आहे. त्याची 168 चेंडूत 222 धावांचीही खेळी कधीच न विसरता येणारी आहे.
विशेष म्हणजे ही खेळी त्याने चौथ्या डावात केली होती. ही स्फोटक खेळी करूनही तो संघाचा पराभव वाचवू शकला नाही. क्रिकेटमधील अभिरुची संपल्याने त्याने 2007च्या विश्वचषकापूर्वीच त्याने क्रिकेटला रामराम ठोकला. क्रिकेटप्रमाणे त्याने कार रेसिंगमध्येही आपली छाप सोडली आहे.
न्यूझीलंडकडून खेळताना या सलामीच्या फलंदाजाने 81कसोटी सामन्यात 36.73 च्या सरासरीने 4702 धावा केल्या आहेत. त्यात 11 शतकांचा समावेश आहे. तर 223 वनडेमध्ये सामन्यात 34.93 च्या सरासरीने 7090 धावा केल्या आहेत. त्यात 16 शतके 41 अर्धशतके ठोकली.