---Advertisement---

फिरकीपटू नॅथन लायनने भल्याभल्या फलंदाजांना सोडले मागे, दिवस-रात्र कसोटीत षटकारांचा केला भीमपराक्रम

On: शनिवार, जानेवारी 15, 2022 6:58 PM
Nathan-Lyon
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS Vs ENG) यांच्यात होबार्ट येथे प्रतिष्ठित ऍशेस मालिका २०२१-२२ (Ashes Series 2021-22) चा पाचवा आणि अंतिम सामना (Hobart Test) सुरू आहे. दिवस-रात्र (Day-Night Test) स्वरुपात हा सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ हा सामना जिंकत ४-० च्या अंतराने मालिका खिशात घालण्यासाठी खेळत आहे. तर इंग्लंडचा संघ लाज राखण्यासाठी या सामन्यात विजयासाठी झगडतो आहे. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन (Nathan Lyon) याने फलंदाजीत मोठा विक्रम केला आहे. 

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने ७५.४ षटकात ३०३ धावा फलकावर लावल्या. यात लायनच्या ३१ धावांच्या झंझावाती खेळीचाही समावेश आहे. संघातील आघाडीचे ९ फलंदाज पव्हेलियनला परतल्यानंतर दहाव्या क्रमांकावर लायन फलंदाजीला आला होता. यावेळी लायनने इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे बेधडक फटकेबाजी केली. त्याने ११४ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. यादरम्यान त्याने मार्क वुडला ३ खणखणीत षटकारही मारले.

व्हिडिओ पाहा-

वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता

या षटकारांसह लायन दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या एका डावात ३ षटकार ठोकणारा जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू बनला आहे. त्यातही गोलंदाज असूनही त्याने हा किर्तीमान केला हे वाखाणण्याजोगे.

दरम्यान या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात ट्रॅविस हेडने शतकी खेळी केली. त्याने ११३ चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक १०१ धावा चोपल्या. त्याच्या साथीला कॅमरॉन ग्रीनने ७४ धावांचे योगदान दिले. तसेच सलामीवीर मार्नस लाब्यूशेन याचे केवळ ६ धावांनी अर्धशतक हुकले. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड आणि मार्क वुड यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा- वनडे मालिकेसाठी सरावाला लागला भारतीय संघ, कसोटी मालिकेचा वचपा काढण्यावर असेल ‘राहुलसेने’ची नजर

प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १८८ धावांवरच गारद झाला. इंग्लंडकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. कर्णधार जो रूट याने या डावात सर्वाधिक ३४ धावा केल्या. या डावात ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा एकदा कर्णधार पॅट कमिन्स याने उत्तम गोलंदाजी केली. त्याने या डावात इंग्लंडच्या ४ फलंदाजांना पव्हेलियनला धाडले. तसेच मिचेल स्टार्क यानेही ३ विकेट्स घेतल्या. याच्या उत्तरात दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाचा संघ ३ बाद ३७ धावा अशा स्थितीत आहे. स्टिव्ह स्मिथ आणि स्कॉट बोलँड फलंदाजी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

वनडे मालिकेसाठी सरावाला लागला भारतीय संघ, कसोटी मालिकेचा वचपा काढण्यावर असेल ‘राहुलसेने’ची नजर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियासाठी व्हिलन ठरले ‘हे’ ३ फलंदाज

अनुभवाची मोठी शिदोरी पाठीशी असणारे ‘हे’ पाच जण गाजवणार मेगा लिलाव

हेही पाहा-

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---