Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वनडे मालिकेसाठी सरावाला लागला भारतीय संघ, कसोटी मालिकेचा वचपा काढण्यावर असेल ‘राहुलसेने’ची नजर

वनडे मालिकेसाठी सरावाला लागला भारतीय संघ, कसोटी मालिकेचा वचपा काढण्यावर असेल 'राहुलसेने'ची नजर

January 15, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
Team-India

Photo Courtesy: Twitter/@ShikharDhawan


भारताचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) असून नुकतीच उभय संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका (3 Matches ODI Series) झाली आहे. या मालिकेनंतर आता दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघ वनडे मालिकेसाठी आमने सामने येतील. या मालिकेसाठी अनुभवी शिखर धवन (Shikhar Dhawan), भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादवसह एकूण ८ खेळाडू दक्षिण आफ्रिकेत आले असून त्यांनी सरावासही (Team India Started Training) सुरुवात केली आहे. धवनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट टाकत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 

सर्व भारतीय खेळाडू दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यानंतर केपटाऊनमध्ये ३ दिवसांच्या अनिवार्य क्वारंटाईन कालावधीतून गेले आहेत. शुक्रवारी (१४ जानेवारी) सकाळी त्याचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. त्यानंतर त्यांनी न्यूलँड्स येथील नेट्समध्ये सरावास सुरुवात केली आहे. धवनने आपल्या ट्वीटर अकाउंटवर सर्व खेळाडूंचा सरावाला जात असतानाचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्याने आपला नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असतानाचाही व्हिडिओ शेअर केला आहे.

Training Day 1 ✅ Strong session with the boys 👍🇮🇳 pic.twitter.com/TT027kSR1t

— Shikhar Dhawan (@SDhawan25) January 14, 2022

Shikhar Dhawan gearing up 🏏 pic.twitter.com/Zkn3iGJFKC

— Himalayan Guy (@RealHimalayaGuy) January 15, 2022

Gabbar in nets 🏏 pic.twitter.com/i61HaF9QPA

— Himalayan Guy (@RealHimalayaGuy) January 15, 2022

धवनबरोबरच भुवनेश्वर, सूर्यकुमार, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, प्रसिद्ध कृष्णा, वेंकटेश अय्यर आणि युझवेंद्र चहल हेदेखील नेट्समध्ये घाम गाळत आहेत.

९ वर्षांनंतर फलंदाज म्हणून मैदानात उतरणार विराट
दरम्यान हे ८ खेळाडू सोमवार रोजी विराट कोहली, कर्णधार केएल राहुल, उपकर्णधार जसप्रीत बुमराह आणि इतर संघ सहकाऱ्यांसोबत सहभागी होतील. त्यानंतर १९ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारतामध्ये ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेत २०१३ नंतर पहिल्यांदाच विराट भारतीय संघातून फलंदाजांच्या रूपात खेळताना दिसेल.

व्हिडिओ पाहा-

भारतीय संघ २०१८ मधील विजयाची करेल पुनरावृत्ती
यापूर्वी भारतीय संघाने वर्ष २०१८ मध्ये कोहलीच्या नेतृत्त्वाखाली दक्षिण आफ्रिकेला वनडे मालिकेत ४-१ ने पराभूत केले होते. अशात विद्यमान संघ या विजयापासून प्रेरणा घेत वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरेल. तसेच ही वनडे मालिका जिंकत कसोटी मालिका पराभवाचा वचपा काढण्यावरही भारतीय संघाची नजर असेल. वनडे मालिकेत भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची कमान केएल राहुल याच्या हाती असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियासाठी व्हिलन ठरले ‘हे’ ३ फलंदाज

अनुभवाची मोठी शिदोरी पाठीशी असणारे ‘हे’ पाच जण गाजवणार मेगा लिलाव

अजब गजब! दोन वेगवेगळ्या देशात स्टेडियम असल्यामुळे रद्द करावा लागला सामना, कारणंही आहे तसंच

हेही पाहा-


Next Post
stuart-broad

ब्रॉड बनला 'अव्वल नंबरी'! ऍशेस इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले स्वतःचे नाव

Nathan-Lyon

फिरकीपटू नॅथन लायनने भल्याभल्या फलंदाजांना सोडले मागे, दिवस-रात्र कसोटीत षटकारांचा केला भीमपराक्रम

Virat Kohli

बिग ब्रेकिंग! विराट कोहली कसोटी कर्णधारपदावरूनही पायउतार, सोशल मीडियावर केली घोषणा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143