भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. चौथ्या दिवसाच्या खेळानंतर सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला असून, भारतीय संघाकडे विजयाची संधी असेल. भारतीय फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी केल्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना या डावात मोठा संघर्ष करावा लागला. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा आतापर्यंत सर्वात यशस्वी गोलंदाज राहिलेल्या नॅथन लायन याच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाने उभारलेल्या 480 धावांच्या प्रतिउत्तरात भारतीय फलंदाजांनी देखील सडेतोड उत्तर दिले. सलामीवीर शुबमन गिलने कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक पूर्ण करताना 128 धावांची खेळी केली. त्यानंतर विराट कोहलीने खेळाची सूत्रे आपल्याकडे घेतली. तीन वर्षांपेक्षा अधिकच्या कालावधीनंतर त्याने कसोटी शतक झळकावले. अक्षर पटेलने अर्धशतक करत त्याला साथ दिली. विराटने 186 धावांची खेळी केली. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर पहिल्या डावात 91 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
भारताच्या डावात ऑस्ट्रेलियाकडून अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनने संयुक्तरीत्या सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याने सर्वाधिक 65 षटके गोलंदाजी करताना 151 धावा दिल्या. लायनने आपल्या कसोटी कारकीर्दीत प्रथमच 65 षटके गोलंदाजी केली. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध मागील वर्षी गॉल कसोटीत त्याने 64 षटके गोलंदाजी केलेली. तर त्याआधी सिडनी कसोटीत त्याने 57.2 षटके गोलंदाजी केली होती. त्यामुळे अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात आता त्याच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक गोलंदाजी करण्याचा नकोसा विक्रम वेस्ट इंडीजच्या सोनी रामधीन यांच्या नावे आहे. त्यांनी 1957 मध्ये सर्वाधिक 98 षटके गोलंदाजी केलेली.
(Nathan Lyon Bowl Most Overs In An Inning In His Test Carrier Ahmedabad Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियासह केकेआरचे वाढले टेन्शन! श्रेयसची दुखापत गंभीर? इतक्या दिवसांसाठी होऊ शकतो बाहेर
शतकानंतर विराट चुंबन घेत असलेले ते लॉकेट का आहे खास?






टी20 वर्ल्डकप 2026: एमएस धोनी करणार का कमेंट्री? माजी कर्णधारने दिला थेट उत्तर