मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे शनिवारपासून (२६ डिसेंबर) यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहुण्या भारतीय संघात ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी कमालीचे प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला १९५ धावांवर रोखले. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राअखेर ३ बाद ९० धावा केल्या होत्या. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फलंदाज हनुमा विहारी नाबाद संघाचा डाव पुढे नेत होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने ही भागिदारी तोडत भारताच्या अडचणीत भर घातली आहे.
स्मिथच्या हातून केले विहारीला झेलबाद
झाले असे की, विहारी आणि रहाणे मिळून सावधानीने फलंदाजी करत होते. विहारीने डावातील ४४व्या षटकापर्यंत १७ धावाही केल्या होत्या. त्यानंतर या भागिदारी जोडीला तोडण्याचा हेतूने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने फिरकीपटू नॅथन लायनचे अस्त्र वापरण्याचा विचार केली. त्या अनुशंगाने त्याने डावातील ४५वे षटक लायनकडे सोपवले.
लायनच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर विहारी धाव घेऊ शकला नाही. पण त्यापुढील चेंडूवर त्याने जोरदार चौकार ठोकला. त्यानंतर विहारीने लायनच्या षटकातील पाचव्या चेंडूवरही मागच्या बाजूला शॉट मारत चार धावा खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु लायनच्या फिरकीमुळे चेंडू जास्त दूरवर गेला नाही आणि यष्टीमागे क्षेत्ररक्षण करत असलेल्या स्टिव्ह स्मिथने सहज झेल पकडला. अशाप्रकारे २ चौकारांच्या मदतीने २१ धावा करत विहारी मैदानाबाहेर पडला.
The 🐐 gets the breakthrough!
Vihari on his way and Australia snap the partnership #AUSvIND pic.twitter.com/yXpFeEk8RY
— 7Cricket (@7Cricket) December 27, 2020
Lyon roars and Vihari is out! Big wicket for the Aussies 🦁 #AUSvIND pic.twitter.com/xKGwPCrkrj
— News Cricket (@NewsCorpCricket) December 27, 2020
WICKET! Vihari goes for 21 after he tries the sweep but the ball flicks off his glove and is caught by Smith
4-116
📺Watch Day 2 #AUSvIND Test on Fox Cricket or Kayo: https://t.co/Bp1efaz5MO
📝Live blog: https://t.co/escskuGMiv
📱Match Centre: https://t.co/hSscBuONMn pic.twitter.com/uHazuleUTR
— Fox Cricket (@FoxCricket) December 27, 2020
विहारीच्या रुपात भारताने चौथी विकेट गमावली आणि सोबतच रहाणे-विहारीची ५२ धावांची भागिदारीही मोडली.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS Live : रहाणेची संयमी फलंदाजी, भारताच्या ५० षटकात ४ बाद १३४ धावा
कर्णधार असावा असा! ‘या’ दिग्गजांनी केले अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे कौतुक
टीम पेनने डाइव्ह मारत एका हाताने पकडला पुजाराचा सुरेख झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल