भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ च्या फरकाने पुढे आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने विजय मिळवला होता. तसेच पुढील २ कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला आहे. मालिकेतील सुरुवातीचे २ सामने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आले होते आणि तिसरा सामना अहमदाबादमधील नरेंद मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला होता. मालिकेतील चौथा आणि अंतिम कसोटी सामना देखील याच मैदनावर पाहायला मिळणार आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यापासूनच अनेक दिग्गजांनी खेळपट्टीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांचे मिळून एकूण ३० गडी बाद झाले. यातील २८ गडी फिरकी गोलंदाजानी बाद केले होते. त्यातही हा सामना दोन दिवसातच संपल्याने खेळपट्टीबद्दलच्या चर्चेला उधाण आले. अशातच ऑस्ट्रेलियन संघाच्या फिरकी गोलंदाजाने देखील या प्रकरणात उडी घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच ऑस्ट्रेलिया संघासाठी १०० कसोटी सामने खेळणाऱ्या नॅथन लायनने म्हटले की, “जगभरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात आम्ही जलद गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टी वर ४६,६० सारख्या धावांवर बाद होऊन जातो. परंतु, त्यावेळी कोणी प्रश्न उपस्थित करत नाही. तसेच ज्यावेळी खेळपट्टी, फिरकी गोलंदाजांना मदत करायला सुरुवात करते. त्यावेळी जगभरातील सर्वच रडायला सुरुवात करतात. मला हे काही कळाले नाही. असो, मी या गोष्टीचा खूप आनंद घेतला.”
तसेच आपल्या सुरुवातीच्या काळात पीच क्युरेटरची भूमिका पार पाडणाऱ्या लायनने अहमदाबादमधील खेळपट्टी बनवणाऱ्या पीच क्युरेटरबद्दल गमतीने बोलताना म्हटले,” मी पूर्ण रात्र या सामन्याचा आनंद घेत होतो. तसेच मी विचार करत आहे की, पीच क्युरेटरला सिडनीमध्ये बोलवून घ्यावं.”
याआधी देखील अनेक दिग्गज खेळाडूंनी या प्रकरणात आपले मत मांडले आहे. सर्वांनी फिरकी गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. अशातच अनेक फिरकी गोलंदाजांनी या प्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली आहे. जगभरातील जास्तीत जास्त खेळपट्टी वर जलद गोलंदाजांना मदत मिळत असते. त्यावेळी कोणीच प्रश्न उपस्थित करत नाही. तसेच माजी भारतीय गोलंदाज प्रज्ञान ओझा याने म्हटले होते की, जेव्हा फलंदाज ४०० धावा करतात, तेव्हा खेळपट्टीबद्दल कोणीच का बोलत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ पूर्वी धोनीनी दिली ‘या’ मंदिराला भेट, चाहत्यांबरोबर सेल्फीही काढले, पाहा फोटो
T20 Series: कोहलीसाठी डोकेदुखी; विजय हजारे ट्रॉफीत ‘यांचे’ धडाकेबाज प्रदर्शन, कुणाची करावी निवड?