जगभरातील क्रिकेटवर नियंत्रण ठेवणाऱ्या आयसीसीने सोमवारी मोठे पाऊल उचलत मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट लीगवर बंदी घातली आहे. यूएसए क्रिकेटने आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आले असल्याचे समोर येत आहे. ज्यामध्ये प्लेइंग इलेव्हनशी संबंधित नियमांचे पालन न केल्याचे नमूद आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, आता आयसीसीने भविष्यातील सर्व हंगामांसाठी मान्यता न देण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रिकेटच्या पटलावर हळुहळू आपले नाव कमावण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमेरिकन क्रिकेटला आयसीसीने तिथल्या लीगवर बंदी घातल्याने मोठा धक्का बसला आहे. आयसीसीने यूएस क्रिकेट बोर्डाला पत्र लिहून या लीगच्या भविष्यातील आवृत्त्यांना मान्यता देणार नसल्याचे कळवले आहे.
नियमानुसार प्लेइंग इलेव्हनमध्ये किमान 7 अमेरिकन खेळाडू असायला हवे होते. पण घडले त्याच्या उलट. सामन्यादरम्यान 6-7 परदेशी खेळाडू क्षेत्ररक्षण करताना दिसले. याशिवाय नॅशनल क्रिकेट लीगदरम्यान खेळपट्ट्यांमध्ये ड्रॉपचा वापर करण्यात आला होता. त्या अतिशय वाईट होत्या. वहाब रियाझ आणि टायमल मिल्ससारख्या खेळाडूंना या खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजी करावी लागली. जेणेकरून त्यांच्या चेंडूंमुळे फलंदाजांना दुखापत किंवा इजा होणार नाही.
लीगमध्ये इमिग्रेशन नियमांचेही उल्लंघन झाल्याचे क्रिकबझच्या अहवालात म्हटले आहे. बहुतेक परदेशी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वैध क्रीडा व्हिसा घेऊन आले नव्हते. अमेरिकेत स्पोर्ट्स कॅटेगरी व्हिसासाठी किमान 2 लाख यूएस डॉलर्स लागतात. हे पैसे वाचवण्यासाठी केले गेले आहे. अमेरिकेत अनेक प्रवासी राहतात ज्यांना क्रिकेट आवडते. या कारणास्तव यूएसए T20 आणि T10 लीगचे केंद्र म्हणून उदयास आले.
🚨 USA’s National Cricket League has been banned by the ICC @smit2592 with the full story: https://t.co/QsdnkqVBId pic.twitter.com/lDLEnnDhMJ
— Cricbuzz (@cricbuzz) December 10, 2024
अमेरिकेच्या नॅशनल क्रिकेट लीगमध्ये सचिन तेंडुलकर तसेच जागतिक क्रिकेटमधील इतर महान खेळाडूंचा समावेश आहे. व्हिव्हियन रिचर्ड्स, वसीम अक्रम, सुनील गावस्कर, झहीर अब्बास, दिलीप वेंगसरकर, मोईन खान आणि व्यंकटेश प्रसाद यांसारखे अनेक दिग्गज संबंधित आहेत.
हेही वाचा-
संघाचा मोठा निर्णय, हा खेळाडूचं असणार 2025 पर्यंत हेड कोच!
Champions Trophy; “आम्हाला लेखी आश्वासन…”, हायब्रीड मॉडेलसाठी पीसीबीची आयसीसीसमोर आणखी एक अट!
‘तो चांगल्या स्वभावाचा…’, दिग्गज ऑस्ट्रेलियन गोलंदाज मोहम्मद सिराजचा मोठा चाहता