---Advertisement---

मीराबाईचा सुवर्ण धडाका सुरूच! राष्ट्रीय स्पर्धेतही केली विक्रमी कामगिरी

On: शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022 11:33 PM
mirabai chanu
---Advertisement---

सध्या गुजरातमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 हंगाम खेळला जात आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत भारतीय लेकींनी चमकदार कामगिरी केली आहे. शुक्रवारी, 30 सप्टेंबर वेटलिफ्टिंग पासून ते रेस वॉकपर्यंत भारतीय महिलांनी जबरदस्त प्रदर्शन केले आणि पदके देखील जिंकली. शूटिंगमध्ये काही अप्रतिम सामने पाहायला मिळाले. 

20 किमी रेस वॉकमध्ये उत्तर प्रदेशची मुनिता प्रजापती हिने सुवर्ण पदक जिंकले आहे.  या युवा खेळाडूची घरची परिस्थिती अतिशय सामान्य आहे. तिचे वडील मजदूर आहेत. पण एवढ्या सगळ्या समस्या असताना देखील या युवा खेळाडूने सुवर्ण पदक नावावर केले. पुरुषांच्या 20 किमी रेस वॉकमध्ये सर्विसेसचा देवंद्र सिंग याने सुवर्ण पदक जिंकले.

पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये महाराष्ट्राचा रुद्राक्ष पाटील याने सुवर्ण पदक जिंकले. तसेच महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये एनवानिल वलारिवन याने गुजरातसाठी गोल्ड मेडल जिंकले. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनी गडाता मणिपूरची मिराबाई चानू हिने सुवर्ण पदक पटकावले. पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात अरुणाचल प्रदेशची चारू पेसी हिने सुवर्ण पदक जिंकले.

दरम्यान, यावर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत (National Games 2022) 28 राज्यांतील आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 7000 खेळाडू सहभाग घेत आहेत. गुजरातच्या एकूण 6 षहरांमध्ये ही स्पर्धा खेळला जात आहे. अहमदाबाद, गांधीनंतर, सूरत, वडोदरा, राजकोट आणि भावनगर या शहरांमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे सामने आयोजित केले गेले आहे.  स्पर्धेला प्रेक्षकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
16 वर्षांखालील हॉकी स्पर्धा: यजमान एसएनबीपी अकादमीचा चमकदार विजय
‘रोहित वर्ल्डकपमध्ये शतक ठोकणार’; चक्क इंग्लंडच्या खेळाडूने केली भविष्यवाणी 
मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीला करायचयं टीम इंडियात कमबॅक! म्हणाला…   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---