---Advertisement---

दोन संघांच्या चाहत्यांमध्ये पेटला वाद, केली जबरदस्त मुक्क्यांची बरसात; पाहा लाईव्ह सामन्यातील ढिशुम ढिशुम!

On: मंगळवार, एप्रिल 6, 2021 7:07 AM
---Advertisement---

एखाद्या लाईव्ह सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू किंवा चाहत्यांमध्ये छोटा-मोठा वाद रंगल्याचे पाहाणे साधारण आहे. बऱ्याचदा असे प्रसंग आपल्या नजरेत येत असतात. मात्र कधीकधी हा वाद पेट घेत याचे मोठ्या विवादात रुपांतर होते. असेच काहीसे ऑस्ट्रेलियामधील नॅशनल रग्बी लीगच्या (एनआरएल) चालू सामन्यात पाहायला मिळाले.

परंतु हा वाद खेळाडूंमध्ये तर दोन संघांच्या प्रशंसकांमध्ये झाला. या वादात ३ चाहत्यांनी एकमेकांना जोराची मारहाण केल्याचे दिसले. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

लाइव्ह सामन्यात ढिशुम ढिशुम
तर झाले असे की, सोमवारी (५ एप्रिल) नॅशनल रग्बी लीगमधील एक सामना वेस्ट टायगर्स विरुद्ध इल्स संघात झाला. हा सामना पाहायला आलेले काही चाहते आपापसांत भिडल्याचे दिसले. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, वेस्ट टायगर्स संघाचा एक चाहता येतो आणि तो विरोधी इल्स संघाच्या चाहत्यावर जोराचा पंच (मुक्का) मारतो. हे पाहून तो विरोधी इल्स संघातील चाहताही शांत न बसता पलटवार करतो.

यादरम्यान वेस्ट टायगर्स संघाचा एक चाहता सहकारी पहिल्या चाहत्याच्या पाठिंब्याला येतो आणि विरोधी इल्स संघाच्या चाहत्याला मारु लागतो. हा वाद वाढत असल्याचे पाहून त्वरित स्टेडियमचा सिक्योरिटी गार्ड घटनास्थळी पोहोचतो आणि वाद मिटवतो.

इल्सचा विजय , वेस्ट टायगर्सचा पराजय
वेस्ट टायगर्स विरुद्ध इल्स यांच्यात झालेल्या नॅशनल रग्बी लीग सामन्यात अखेर इल्स संघाने बाजी मारली. त्यांनी वेस्ट टायगर्सला ३६-२२ च्या अंतराने पराभवाची धूळ चारली.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल प्रेमींसाठी खुशखबर! वानखेडे स्टेडियमचा ग्राउंड स्टाफ सुटला कोरोनाच्या तावडीतून

सचिन लेक आयपीएल पदार्पणासाठी करतोय कसून सराव, पाहा त्याची अफलातून गोलंदाजी 

फखर जमानला फेक फिल्डिंगने बाद केल्याने क्विंटन डीकॉक वादाच्या भोवऱ्यात; पाहा नियम नक्की काय सांगतो?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---