इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम काही दिवसांवर आला आहे. चेन्नई येथे ९ एप्रिल रोजी गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील लढतीने या हंगामाचा शुभारंभ होणार आहे. तत्पुर्वी अनुभवी शिलेदारांसह नवखे शिलेदारही सराव सत्रात घाम गाळताना दिसत आहेत. अशात भारतीय दिग्गज सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर हादेखील त्याची प्रतिभा संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी मेहनत घेत आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव सत्रात कसून सराव करताना दिसत आहे. अष्टपैलू अर्जुन हातखंडा असलेल्या गोलंदाजीच्या सरावावर अधिक भर देताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर त्याचा सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
२१ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन याला मुंबई इंडियन्सने २० लाखांच्या मुळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सहभागी केले होते. त्यामुळे आयपीएल पदार्पणासाठी तो स्वत:ला झोकून देत मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. मात्र मुंबई इंडियन्सची पहिलीच लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध असल्याने त्याला आयपीएल पदार्पणासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागू शकते.
Open net session ✅????
Getting used to the heat ✅????
Being match-ready ✅????#OneFamily #MumbaiIndians #MI #IPL2021 pic.twitter.com/crkeJBkOHU— Mumbai Indians (@mipaltan) April 5, 2021
मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ
मुंबई इंडियन्सने मागीलवर्षी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याचा कारनामा केला होता. हा कारनामा करणारा मुंबई इंडियन्स एकमेव संघ आहे. त्यांच्या खालोखाल चेन्नई सुपर किंग्सने ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
असा आहे मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२१ साठी संघ –
रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे (यष्टीरक्षक), किरोन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान, नेथन कुल्टर नाईल, ऍडम मिल्ने, पियुष चावला, जेम्स निशम, युधविर चरक, मार्को जेन्सन, अर्जुन तेंडूलकर
असे आहेत आयपीएल २०२१ मधील मुंबई इंडियन्सचे साखळी फेरीतील सामने –
९ एप्रिल – चेन्नई, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी ७.३० वाजता
१३ एप्रिल – चेन्नई, केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१७ एप्रिल- चेन्नई, मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
२० एप्रिल- चेन्नई, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ एप्रिल – चेन्नई, पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२९ एप्रिल – दिल्ली, मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी ३.३० वाजता
१ मे – दिल्ली, मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
४ मे – दिल्ली, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
८ मे – दिल्ली, राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१० मे – बंगळुरू, मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१३ मे – बंगळुरू, मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, दुपारी ३.३० वाजता
१६ मे – बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२० मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – कोलकाता, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वाजता
महत्त्वाच्या बातम्या-
फखर जमानला फेक फिल्डिंगने बाद केल्याने क्विंटन डीकॉक वादाच्या भोवऱ्यात; पाहा नियम नक्की काय सांगतो?
IPL: विराटशी झालेल्या वादानंतर पंचांनी तोडला होता खोलीचा दरवाजा, द्यावे लागले होते ‘इतके’ रुपये
आयपीएल २०२१ : ‘हे’ आहेत आयपीएलच्या प्रत्येक संघाचे महागडे खेळाडू