भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या कसोटी मालिकेची जितकी चर्चा रंगली, तितकीच चर्चा सध्या एका भारतीय क्रिकेट रसिकाने काही भारतीय खेळाडूंच्या दिलेल्या हॉटेल बिलाची होत आहे.
भारतीय संघातील खेळाडू रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शुभमन गिल व नवदिप सैनी हे मेलबर्न येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता, तेथे नवलदीप सिंग नामक एका भारतीय व्यक्तीने त्यांचे हॉटेल बिल खेळाडूंना न सांगता भरले. तो भारतीय संघाचा चाहता आहे. त्याचमुळे त्याला हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेटपटूंना पाहून आनंद झाला आणि त्याने बिल भरले. याचा खुलासा त्याने त्याच्या ट्विटरच्या माध्यमातून केला.
याबरोबरच त्याने बिलाचा फोटोही ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात दिसते की या जेवणाचे एकूण बील 118.69 ऑस्ट्रेलियन डॉलर इतके झाले होते. भारतीय रुपया नुसार हे बिल जवळजवळ 6683 रुपये इतके आहे. तसेच या बिलात दिसते की भारतीय क्रिकेटपटूंनी सॉय सॉस चिकन, चिकन मशरूम आणि डायट कोक अशा पदार्थांची ऑर्डर दिली होती.
They are not aware but i have paid there table bill 🙂 . Least i can do for my superstars ???? pic.twitter.com/roZgQyNBDX
— Navaldeep Singh (@NavalGeekSingh) January 1, 2021
हे बिल भारतीय क्रिकेटपटूंना पडले महागात
ज्यावेळी भारतीय क्रिकेटपटूंना कळाले की या चाहत्याने बिल भरले, तेव्हा त्यांनी त्याच्याशी संवाद साधत त्याला बिलाचे पैसे घेण्याचा आग्रह केला, मात्र नवलदीपने ते पैसे घेतले नाहीत, असा दावा नवलदीपने त्याच्या ट्विटरवर केला आहे.
मात्र यानंतर कोरोना नियमांचा मुद्दा समोर आणत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने देखील या बाबीची गंभीर दखल घेतली असूम, सर्व 5 खेळाडूंना भारतीय संघापासून वेगळे करून एका वेगळ्या बायो बबलमध्ये ठेवण्यात आले आहे. यात खेळाडूंना सराव करण्याची संधी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कारणामुळे चालत नाहीये स्टीव्ह स्मिथची बॅट, लॅब्यूशानेने केला खुलासा
…अन् २८ वर्षांपूर्वी ‘या’ भारतीयाच्या विकेटने शेन वॉर्न पर्वाची सुरुवात झाली
‘तो’ क्रिकेटपटू भारतीय गोलंदाजांचा कर्णधार, माजी दिग्गज क्रिकेटपटूचा खुलासा






