---Advertisement---

नादच खुळा! १४० किमी ताशी वेगाचा चेंडू छातीवर लागला, तरीही पुढे केला राडा

On: शनिवार, ऑक्टोबर 3, 2020 11:49 PM
---Advertisement---

चालू क्रिकेट सामन्यात कधी-कधी अशा थरारक गोष्टी पाहायला मिळतात, ज्यांना पाहून चाहतेच नव्हे तर खेळाडूही दंग राहतात. आयपीएल २०२०च्या १५व्या सामन्यातही असंच काही पाहायला मिळालं. या सामन्यादरम्यान एक जोरदार चेंडू राजस्थान रॉयल्स संघाचा फलंदाज राहुल तेवतियाच्या छातीला लागला.

अबु धाबी येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान संघात पार पडलेल्या सामन्यात हे दृश्य पाहायला मिळाले. झाले असे की, राजस्थान संघाचा डाव चालू होता. १७व्या षटकापर्यंत संघाची धावसंख्या ६ बाद ११६ धावा इतकी झाली होती. त्यामुळे शेवटच्या ३ षटकात राजस्थानचा फलंदाज तेवतिया आणि जोफ्रा आर्चर फलंदाजी करत होते.

अशात बेंगलोर संघाचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट नवदिप सैनी डावातील २०वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकातील पहिल्या चेंडूवर आर्चरने एक धाव घेतली. त्यामुळे स्ट्राईकवर आलेला राहुल आता दूसरा चेंडू खेळण्यासाठी तयार उभा होता. तेवढ्यात सैनी चेंडू टाकण्याठी वेगाने धावत आला आणि चुकीने त्याच्या हातून चेंडू निसटला आणि जाऊन सरळ तेवतियाच्या छातीवर लागला. पंचाने पुढे तो चेंडू नो बॉल असल्याचे सांगितले.

त्या चेंडूचा वेग १४० किमी दर ताशी इतका होता. त्यामुळे तेवतिया मैदानावर कोसळला आणि वेदनेने कळवळू लागला. आजूबाजूला उभे असलेले सर्व खेळाडू हे दृश्य पाहून घाबरून गेले होते. स्वत: सैनीदेखील तेवतियाला पाहून दंग झाला होता. म्हणून तो लगेच तेवतियाच्या जवळ गेला आणि आपल्या चुकिची माफी मागितली.

नंतर फिजिओला मैदानावर बोलवण्यात आले आणि थोड्या वेळात तेवतिया फलंदाजी करण्यासाठी तयार झाला. पण त्याची ही दुखापत किती गंभीर असेल, याविषयी अद्याप काही सांगता येऊ शकत नाही.

https://twitter.com/_pilloyal/status/1312365378123702272

मात्र या धुरंधराने नॉ बॉलचा फायदा घेत पुढील चेंडूवर जबरदस्त षटकार मारला. एवढेच नाही तर, त्यापुढील तिसऱ्या चेंडूवरही त्याने जोरदार षटकार लगावला. त्यामुळे तेवतिया १२ चेंडूत नाबाद राहत २४ धावांची तूफानी खेळी करु शकला. त्याच्या या जबरदस्त फटकेबाजीमुळे राजस्थान संघाला १५४ धावांचा स्कोर उभा करण्यात यश आले होते. पण शेवटी बेंगलोरने सामना जिंकला.

https://twitter.com/turbosu_roy/status/1312365423636090880

https://twitter.com/SalkeDevesh/status/1312359557100789762

महत्त्वाच्या बातम्या-

हॅलोsss आपल्याला IPLची मॅच फिक्स करायचीये… खेळाडूने थेट अँटीकरप्शनलाच दिली माहिती

काय योगायोग आहे राव.! बाद होणारा ‘तो’ आणि त्याला झेलबाद करणारे ‘दोघे’ जन्मलेत एकाच वर्षी

विराट बरसला आणि इतिहास रचून गेला, आयपीएलमध्ये ‘हा’ कीर्तिमान करणारा ठरला पहिलाच

ट्रेंडिंग लेख-

अनुभवी खेळाडूंचा भरणा असणाऱ्या चेन्नईला लोळवणारा १९ वर्षांचा पोरगा, वाचा ‘त्याच्या’ संघर्षाची कहानी

आतापर्यंत आयपीएल २०२०मध्ये गोलंदाजांना धू धू धुणारे टॉप-१० फलंदाज, केल्यात सर्वाधिक धावा

तुम्हाला माहितीये? ‘स्विंग का सुलतान’ असा लौकिक असलेल्या ‘या’ खेळाडूला धोनीनेच दिली होती संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---