दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएल २०२०चा १६वा सामना झाला. शनिवारी (३ ऑक्टोबर) शारजाह येथे झालेला हा सामना दोन्ही संघाचा या हंगामातील तिसरा सामना होता. या सामन्यात एक गजब योगायोग जुळून आला.
झाले असे की, कोलकाता संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे दिल्ली संघाची ठरलेली सलामी जोडी, पृथ्वी शॉ आणि शिखर धवन मैदानावर उतरले. यंदा दमदार फॉर्ममध्ये असलेल्या शॉने जबरदस्त फटकेबाजी करत ६६ धावा ठोकल्या. ४१ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकार मारत त्याने ही धावसंख्या केली. मात्र १३व्या षटकातील चौथ्या चेंडूवर कमलेश नागरकोटी आणि शुबमन गिल यांनी मिळून त्याला झेलबाद केले.
महत्त्वाचे म्हणजे शॉ, नागरकोटी आणि गिल हे तिन्ही युवा खेळाडू २०१८ सालच्या विश्वविजेत्या १९ वर्षांखालील भारतीय विश्वचषक संघाचा भाग होते. त्यामुळे त्यांचे वय १९ किंवा त्यापेक्षा कमी असणे ही साधारण गोष्ट आहे. पण या तिन्ही धुरंधरांच्या वयात केवळ ३-४ महिन्यांचा फरक आहे.
गिलचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ रोजी झाला होता. तर शॉ हा ९ नोव्हेंबर १९९९ आणि नागरकोटी हा २८ डिसेंबर १९९९ रोजी जन्मला होता. म्हणजे एकाच वर्षी ४ महिन्यांच्या कालवधीत हे तिन्ही खेळाडू जन्मले होते. असे असले तरी, हे तिन्ही खेळाडू भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील आहे. गिल पंजाब, शॉ महाराष्ट्र आणि नागरकोटी राजस्थानचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट बरसला आणि इतिहास रचून गेला, आयपीएलमध्ये ‘हा’ कीर्तिमान करणारा ठरला पहिलाच
कोहलीच्या ‘विराट’ खेळीने राजस्थानची बत्ती गुल, पॉईंट टेबलमध्ये आरसीबी आली ‘या’ स्थानावर
अर्धशतक किंग! २० वर्षीय पडिक्कलने ‘या’ दिग्गजांना मागे टाकत मिळवली आघाडी, पाहा काय केलाय पराक्रम
ट्रेंडिंग लेख-
अनुभवी खेळाडूंचा भरणा असणाऱ्या चेन्नईला लोळवणारा १९ वर्षांचा पोरगा, वाचा ‘त्याच्या’ संघर्षाची कहानी
आतापर्यंत आयपीएल २०२०मध्ये गोलंदाजांना धू धू धुणारे टॉप-१० फलंदाज, केल्यात सर्वाधिक धावा
यशस्वी जयस्वाल आणि धोनीच्या फोटोने घातलाय युपीतील ‘या’ जिल्ह्यात धुमाकूळ, वाचा काय आहे नक्की स्टोरी