रविवारी (21 जूलै) बीसीसीआयने पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यासाठी वनडे, टी20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहिर केला आहे. या दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी वेगवान गोवंदाज नवदीप सैनीची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे.
सैनीने यावर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने 2019 आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात शेन वॉटसनला 151 किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकत सर्वांना प्रभावित केले होते. हा चेंडू वॉटसनच्या हेल्मेटला लागून तो खाली पडला होता.
कर्नाळ, हरियाणा येथील असणाऱ्या सैनीने आयपीएलमध्येच नाही तर मागील 6 वर्षात दिल्लीकडून खेळताना देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 2013 पर्यंत सैनीने लेदर बॉलचे क्रिकेट खेळलेले नाही. तो कर्नाळमध्ये टेनिस बॉल स्पर्धा खेळून प्रत्येक सामन्याचे 200 रुपये मिळवायचा.
पण दिल्लीचे माजी गोलंदाज सुमित नरवाल यांनी अयोजित केलेल्या कर्नळ प्रीमीयर लीग या टेनिस बॉल स्पर्धेत नरवाल यांनीच सैनीमधील प्रतिभा हेरली. त्यानंतर सैनीने दिल्लीच्या नेटमध्ये गोलंदाजी केली. त्यावेळी त्याच्या वेगाने भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर प्रभावित झाला.
गंभीरने सैनीला बूट घेऊन दिले तसेच त्याला नियमितपणे दिल्लीच्या नेटमध्ये गोलंदाजीसाठी बोलावले. सैनीला गंभीरचा पाठिंबा मिळाला होता. गंभीर सैनीला रणजी ट्रॉफीसाठी दिल्ली संघात घेण्यासाठी निवड समीतीशी देखील भांडला. अखेर गंभीरच्या प्रयत्नांना यश आले आणि सैनीची 2013-14 मोसमासाठी दिल्ली संघात निवड झाली.
सैनीने 2013 ला विदर्भविरुद्ध दिल्लीकडून पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. या सामन्यात त्याने चमकदार म्हणावी अशी कामगिरी केली नाही पण त्याने 2 विकेट काढल्या होत्या. पण त्यानंतर त्याने मागे वळून न पाहता 2017-18 च्या मोसमात दिल्लीकडून 8 सामन्यात खेळताना सर्वाधिक 34 विकेट्स घेतल्या.
त्याने नंतर भारताच्या अ संघातही स्थान मिळवले आणि भारत अ संघाकडूनही चांगली कामगिरी केली. त्याने मागील वर्षी अफगाणिस्तान विरुद्धच्या भारताच्या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघात स्थान मिळवले होते. पण त्याला अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळाली नाही.
तसेच त्याने 2019 विश्वचषकासाठी इंग्लंडला जाऊन भारताच्या फलंदाजांना नेटमध्येही गोलंदाजी केली. तो या विश्वचषकासाठी भारताच्या राखीव गोलंदाजांमध्येही होता.
तसेच रविवारी(21 जूलै) पार पडलेल्या भारत अ विरुद्ध वेस्ट इंडीज अ संघातील 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळताना त्याने भारताकडून 4 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या. यातील 5 विकेट्स त्याने या मालिकेतील 14 जूलैला झालेल्या दुसऱ्या सामन्यात घेतल्या होत्या.
सैनीने आत्तापर्यंत 43 प्रथम श्रेणी सामने खेळताना 120 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 41 सामन्यात 65 विकेट्स घेतल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–तो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…
–नवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार
–प्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान