Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अफगाणिस्तानचा युवा खेळाडू नडला क्रिकेट ऑस्ट्रेलियाला! म्हणाला, “तुम्ही एकदम बालिश…”

January 12, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ACB

Photo Courtesy: Twitter/ACB


मार्च महिन्यात अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार होती. मात्र, आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अफगाणिस्तानवर राज्य करत असलेल्या तालिबानने महिलांवर घातलेले निर्बंध मागे न घेतल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला.  मात्र, आता अफगाणिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नवीन उल-हक याने या निर्णयाला चांगलाच विरोध केला आहे.

सन 2021 मध्ये तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. आपले राज्य येतात तेथील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले आहेत. विशेषतः महिलांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यावर त्यांनी बंदी घातली आहे. याच गोष्टीला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विरोध दर्शवला. क्रिकेट ऑस्ट्रेलिया सातत्याने महिला क्रिकेट व महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असते. अफगाणिस्तानमध्ये महिलांना क्रिकेट खेळू न दिल्याने ‌‌‌‌ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान सोबतचे क्रिकेट संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी देखील क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्धची एक कसोटी खेळण्यास नकार दिला होता.

time to say won’t be participating in big bash after this until they stop these childish decisions that’s how they went about the one off test now ODI when a country is going through so much in place off being supportive you want to take the only reason of happiness from them #CA

— Naveen ul haq Murid (@imnaveenulhaq) January 12, 2023

 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाला 23 वर्षीय वेगवान गोलंदाज नवीन उल-हक याने विरोध दर्शवला. त्याने ट्विट करत लिहिले,

‘मी बिग बॅश लीगमध्ये यापुढे न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान विरुद्धची वनडे मालिका रद्द करण्याचा बालिशपणाचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला. आधी एक कसोटी सामना रद्द केला. त्यानंतर आता वनडे मालिकेतून बाहेर पडले. ज्या देशात आनंदाच्या अशा काहीच संधी उपलब्ध असतात तिथे पाठिंबा देण्यापेक्षा तुम्ही खच्चीकरण करत आहात.”

नवीन हा बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आत्तापर्यंत दोन सामने खेळताना दोन बळी आपल्या नावे केले होते.

(Naveen Ul Haq Boycott Big Bash After Cricket Australia Cancelled ODI Series Against Afghanistan)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीला हटवून विराटल हवी होती टीम इंडियाची कॅप्टन्सी! माजी प्रशिक्षकाच्या दाव्याने खळबळ
‘जय शाह सर…’, रणजीमध्ये विक्रमी खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉचा बीसीसीआय सचिवांना रिप्लाय


Next Post
Photo Courtesy: Twitter/Hockey India

हॉकी विश्वचषक उंचावल्यास भारतीय खेळाडू होणार करोडपती! ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले बक्षिस

Chamika Karunaratne caught by Axar Patel

उमरान मलिकच्या गतीला मिळाली अक्षर पटेलची साथ, डाईव्ह मारत घेतला नेत्रदीपक कॅच

Photo Courtesy: Twitter/@MahaKesari

महाराष्ट्र केसरी | हर्षवर्धन सदगीर, समीर शेख, वैभव माने, दादूमिया मुलानी, अक्षय मंगवडे, अक्षय शिंदे यांची विजयी घोडदौड कायम

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143