नवी दिल्ली | श्रीलंकेत लंका प्रीमियर लीग (एलपीएल 2020) सुरु होऊन अगदी काही दिवसच झाले असले तरीही या स्पर्धेतील सामन्यात, खेळाडूंमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. अलीकडेच मोहम्मद अमीर आणि शाहिद आफ्रिदी या दोन पाकिस्तानी खेळाडूंची अफगाणिस्तानचा गोलंदाज नवीन उल हक याच्याशी शाब्दिक युद्ध झाले होते. मात्र त्यानंतर हे भांडण थेट सोशल मीडियावर जाऊन पोहोचलं.
वास्तविक शाहिद आफ्रिदीने या भांडणांविषयी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले आणि नवीन-उल-हकला ‘खिलाडूवृत्ती’चा धडा शिकवण्याचा प्रयत्न केला. पण आफ्रिदीने केलेल्या ट्विटला नवीन-उल-हकने प्रत्युत्तर दिले आहे.
लंका प्रीमियर लीगमधील कँडी टस्कर्स आणि गाले ग्लॅडिएटर्स या दोन संघात सुरु असलेल्या सामन्यादरम्यान. 18 व्या षटकात नवीन आणि आमिर यांच्यात मैदानावर शाब्दिक बाचाबाची झाली. सामना संपल्यानंतर शाहिद आफ्रिदीने या भांडणात उडी घेतली आणि स्वतः अफगाणिस्तानच्या या युवा खेळाडूशी तो काहीतरी बोलताना दिसला.
या घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले. यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने नवीन-उल-हकला काही सल्ला दिला. त्याने ट्विटरवर लिहिले की, “तरुण खेळाडूला माझा सल्ला अगदी सोपा होता, खेळ खेळत रहा आणि अपमानास्पद गोष्टी बोलू नका. अफगाणिस्तान संघात माझे मित्र आहेत आणि आमचे अतिशय चांगले नाते आहे. संघातील सहकारी आणि विरोधकांचा आदर करणे ही खेळाची मूलभूत भावना आहे.”
https://twitter.com/SAfridiOfficial/status/1333747883527467009
शाहिद आफ्रिदीच्या या ट्विटला नवीन-उल-हक याने उत्तर दिले. तो म्हणाला, “मी सल्ले घेण्यास आणि आदर देण्यास नेहमीच तयार असतो. क्रिकेट हा एक सज्जनचा खेळ आहे, परंतु जर कोणी म्हटले की तुम्ही सर्वजण आमच्या पायाखाली आहात आणि नेहमीच राहाल, तर ते वाक्य फक्त माझ्याबद्दलच नाही तर माझ्या इतर सहकार्यांबद्दलही आहे. जर तुम्हाला आदर हवा असेल तर तो करायलाही शिका.”
https://twitter.com/imnaveenulhaq/status/1333858605422899200
या सामन्यात कँडी टस्कर्सने गाले ग्लॅडिएटर्सला 25 धावांनी पराभूत केले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘याला कोणीतरी चांगले बूट घेऊन द्या रे’, केएल राहुलची उडवली जातेय खिल्ली
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर