आयपीएल 2023 दरम्यान विराट कोहलीसोबत गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांचा झालेला वाद चर्चेत आहे. 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स आमने सामने होते. या सामन्यात आरसीबीने 18 धावांनी विजय मिळवला आणि सामन्यातील वाद सर्वत्र चर्चेचा विषय बनला. आता नवीन उल हक याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक भाष्य केले, ज्यामुळे विराटसोबत त्याचा वाद पुन्हा चर्चेत आला.
अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज आयपीएल 2023मध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळत आहे. 1 मे रोजी आरसीबीविरुद्धच्या सामन्यात नवीनने थेट विराट कोहली (Virat Kohli) याच्याशीच पंगा घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. पण लखनऊ सुपर जायंट्ससाठी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नवीन उल हक (Naveen Ul Haq) असे म्हटला आहे की, तो कधीच स्वतःहून असे प्रकार (वाद/स्लेजिंग) करत नाही. ही मुलाकथ लखनऊचाच वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) याने घेतली.
मुलाखतीत आवेश खानने त्याला प्रश्न विचारला की, तुझ्या कारकिर्दीतील स्लेजिंगचा असा एखादा प्रसंग सांग, जो तू याठिकाणी शेअर करू इच्छितो. यावर नवीन म्हणाला, “तो कधीच स्वतःहून कुणाला स्लेज करण्याचा प्रयत्न करत नाही.” यानंतर त्याच्यासोबत झालेल्या अशा स्लेगिंजच्या एखाद्या प्रसंगाविषयी विचारले तेव्हा नवीनने देशांतर्गत क्रिकेटमधील एक प्रगंस सांगितला. आवेशने असेही विचारले की, अलिकडच्या काळात असा एखादा प्रसंग झाला आहे का? या प्रश्नानंतर दोघेही हसू लागले.
Avesh. Naveen. Too much fun 😂
Also, wait till 1.39 👀@AstralAdhesives | #bondtite pic.twitter.com/QlKnyZSgHu
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 12, 2023
मुलाखतीत नवीनने पुढे लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीरकडून त्याला समर्थन मिळत असल्याचेही सांगितले. आयपीएल पदार्पणाच्या आधीही गंभीरने त्याला पाठबळ दिले होते. दरम्यान विराट आणि नवीन यांच्यातील वादावर एक नजर टारली, तर लखनऊ आणि आरसीबीमधील लाईव्ह सामन्यात हा वाद सुरू झाला होता. आरसीबीकडून लखनऊला पराभव मिळाल्यानंतर खेळाडू एकमेकांशी हात मिळवत असताना विराट आणि नवीन एकमेकांना भिडले होते. सोबतच गौतम गंभीरही विराटवर संतापला होता. विराट आणि गंभीर यांच्यात आयपीएल इतिहासातील हा दुसरा वाद ठरला. यापूर्वी आयपीएल 2013मध्ये विराट-गंभीर भिडले होते. त्यावेळी विराट आरसीबीचे, तर गंभीर केकेआरचे नेतृत्व करत होता. (Naveen Ul Haq has given his first interview after his spat with Virat Kohli)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘हे’ 6 खेळाडू गुजरातला पोहोचवणार प्ले-ऑफमध्ये? यादीत चार नावे भारतीय
जयस्वालच्या वादळी खेळीमागे आहे ‘हे’ सिक्रेट, सामना संपल्यानंतर म्हणाला, ‘ही खेळी दीर्घकाळ…’