---Advertisement---

नवीन‌ सुधारणार नाही! आरसीबीच्या पराभवानंतर विराटला खिजवण्यासाठी पोस्ट केली इंस्टाग्राम स्टोरी, चाहते संतापले

---Advertisement---

आयपीएल 2023 च्या अखेरच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभूत केले. या पराभवासह आरसीबीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या सामन्यात आरसीबीचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याने शतक झळकावले होते. मात्र, दुसऱ्या बाजूने शुबमन गिलने झळकावलेल्या शतकामुळे आरसीबीला पराभव पत्करावा लागला. मात्र, आरसीबीच्या याच पराभवाची मजा घेत अफगाणिस्तानचा तसेच लखनऊ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक याने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली.

गुजरातविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात केवळ विजयच आरसीबीला प्ले ऑफमध्ये घेऊन जाणार होता. विराट कोहली याने आपला दमदार फॉर्म कायम राखत, सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. विजयासाठी मिळालेले ‌198 धावांचे आव्हान गिलने नाबाद शतक पूर्ण झळकावत अगदी सहजतेने गाठून दिले. त्यामुळे आरसीबीच्या पदरी पराभव पडला.

या पराभवामुळे आरसीबी संघ व चाहत्यांमध्ये नाराजी असताना नवीन याने पुन्हा एकदा विराटला खिजवण्याचा प्रयत्न केला. नवीन याने आरसीबीचा पराभव झाल्यानंतर एका मोठ्याने हसणाऱ्या व्यक्तीचे मीम इंस्टाग्राम स्टोरी म्हणून पोस्ट केले. सर्वजण त्याचा संदर्भ आरसीबीच्या पराभवाशी जोडत आहेत.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1660356131024404480?t=sRmF47lqU0obuJ2J7ql3JQ&s=19

 

साखळी फेरीत लखनऊ विरुद्ध आरसीबी या सामन्यात विराट व नवीन यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर विराट आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये देखील याच प्रकरणामुळे वाद झाला. विराटने त्यानंतर या वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, नवीन सातत्याने सोशल मीडियावर अशा काही पोस्ट करत असतो ज्यामुळे विराटच्या चाहत्यांच्या भावना दुखावतात. अनेकदा मैदानावर नवीन याच्यासमोर चाहते विराट विराट असे ओरडताना देखील दिसले आहेत.

(Naveen UL Haq Instagram Stry After RCB Defeat Virat Fans Angry)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---