इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा एलिमिनेटर सामना (दि. 24 मे) रोजी लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने लखनऊला 81 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात पराभूत होताच लखनऊचे आयपीएलचा किताब जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. या सामन्यात लखनऊकडून शानदार गोलंदाजी करणाऱ्या नवीन उल हक याने मोठी प्रतिक्रिया दिली. नवीन उल हकने गौतम गंभीरविषयी भाष्य केले.
सामन्यानंतर बोलताना वेगवान गोलंदाज नवीन उल हक (Naveen ul Haq) याने संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली. त्याच्या मते, तो गंभीरला एक मार्गदर्शक, एक प्रशिक्षक आणि दिग्गज मानतो. त्याने भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केले आहे.
काय म्हणाला नवीन?
खरं तर, नवीन उल हक म्हणाला की, “मार्गदर्शक, प्रशिक्षक किंवा काहीही, मी मैदानावर संघाच्या प्रत्येक खेळाडूसोबत उभा राहील. मी माझ्या संघाच्या सर्व खेळाडूंकडून ही अपेक्षा करतो. गंभीर भारताचे दिग्गज राहिले आहेत आणि भारतात त्यांना खूप सन्मानही आहे. त्यांनी भारतीय क्रिकेटला खूप काही दिले आहे. एक मार्गदर्शकाच्या रूपात, एका कोचच्या रूपात आणि एका दिग्गजाच्या रूपात मी त्यांचा खूप आदर करतो. मी त्यांच्याकडून खूप शिकलो आहे.”
यासोबतच त्याने म्हटले की, “वैयक्तिक प्रदर्शनापेक्षा संघाचे ध्येय महत्त्वाचे आहे. प्रामाणिकपणे सांगतो, माझ्यासाठी हा हंगाम चांगला होता. आम्ही एक संघाच्या रूपात खूप चांगले करू शकत होतो. मात्र, वैयक्तिक प्रदर्शन संघासाठी महत्त्वाचे नसते. खरं तर, सामन्याच्या शेवटी आमच्या संघाचे लक्ष्य ट्रॉफी जिंकणेच आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “माझे वैयक्तिक प्रदर्शन दुसऱ्या स्थानी येते. माझ्यासाठी हा हंगाम चांगला होता. मी या आयपीएलमधून खूप काही शिकलो आहे. आशा आहे की, मी मजबूतीने पुनरागमन करेल.”
खरं तर, मुंबई इंडियन्स संघाविरुद्धच्या पराभवानंतर नवीन उल हक याला सोशल मीडियावर वाईटरीत्या ट्रोल करण्यात आले. (naveen ul haq on gautam gambhir read here what he said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘रोहित अंडररेटेड कॅप्टन…’, मुंबईला 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या ‘हिटमॅन’विषयी गावसकरांचे धक्कादायक भाष्य
धक्कादायक Video : जीवापेक्षा तिकीट महत्त्वाचं? GTvsMI सामन्याच्या तिकिटासाठी स्टेडिअमबाहेर चेंगराचेंगरी