---Advertisement---

अती घाई संकटात नेई! ऑस्ट्रेलियन खेळाडूची विकेट वाचवण्यासाठीची धडपड बिनकामाची, पाहा कसा झाला बाद

On: शुक्रवार, नोव्हेंबर 4, 2022 4:16 PM
Naveen-Ul-Haq
---Advertisement---

शुक्रवारी (दि. 04 नोव्हेंबर) ऍडलेड येथे टी20 विश्वचषक 2022मधील 38वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान संघात झाला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजाच्या नाकी नऊ आणल्या. शेवटच्या चार षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता धरावा लागला. यातील एक फलंदाज स्वत:च्या चुकीमुळे धावबाद झाला. यादरम्यानचा व्हिडिओ स्वत: टी20 विश्वचषकाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाने उभारले 168 धावांचे आव्हान
या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, ऑस्ट्रेलिया संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 168 धावा चोपल्या. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज केन रिचर्ड्सन याला फक्त एक धाव करता आली आणि तो धावबाद होऊन तंबूत परतला.

नेमकं काय घडलं?
झाले असे की, ऑस्ट्रेलियाच्या डावात पॅट कमिन्स आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यादरम्यान 19वे षटक नवीन उल हक (Naveen Ul Haq) टाकत होता. नवीनच्या दुसऱ्याच चेंडूवर कमिन्स राशिद खान याच्या हातात झेल देऊन बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला केन रिचर्ड्सन (Kane Richardson) आला. रिचर्ड्सन याने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर पुढील दोन्ही चेंडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने खेळून काढले. मात्र, शेवटचा चेंडू फेकताच मॅक्सवेलने तो मारला. यावेळी रिचर्ड्सनने त्याची नॉन स्ट्रायकर एंडची क्रीझ सोडली आणि अती घाई करत धावू लागला. त्यावेळी चेंडू नवीनच्या दिशेनेच आला आणि त्याने तो पकडून नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने फेकला. यावेळी रिचर्ड्सन विकेट वाचवण्यासाठी धावला, पण तोपर्यंत चेंडूने स्टंप्सचा वेध घेतला होता. त्याला यावेळी धावबाद होऊन तंबूत परतावे लागले.

https://www.instagram.com/reel/CkiM_J7o2fW/?utm_source=ig_web_copy_link

रिचर्ड्सन यावेळी आपल्याच चुकीमुळे धावबाद झाला. त्याचा यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रिचर्ड्सन बाद झाला, तेव्हा तो फक्त 1 धावेवर खेळत होता.

या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यांच्याकडून नवीनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 21 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त फजलहक फारूकी याने 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेत आपले योगदान दिले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयर्लंडला लोळवत न्यूझीलंडची थाटात सेमी-फायनलमध्ये एन्ट्री! कॅप्टन केनची शानदार कामगिरी
‘आधी आम्ही सचिनसोबत खेळायचो, पण आता विराटसोबत खेळतोय’, भारताच्या माजी दिग्गजाने केली तुलना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---