भारताची कुस्तीपटू नवज्योत कौरने आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून मोठा इतिहास रचला आहे. आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.
तिने काल जपानच्या मिया इमाईला ६५ किलो फ्री स्टाईल वजनी गटात ९-१ असे एकतर्फी पराभूत करून हे सुवर्णपदक जिंकले आहे. तिने या लढतीत इमाईवर पूर्णपणे वर्चस्व ठेवले होते.
Navjot Kaur wins India's first-ever Asian C’Ships gold in women's wrestling (65 kg). 😭#imnotcryingyourecrying #bishkek2018 pic.twitter.com/gXyZGics4T
— United World Wrestling (@wrestling) March 2, 2018
त्याचबरोबर रिओ ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती साक्षी मलिकने काल ६२ किलो फ्री स्टाईल वजनी गटात कझाकिस्तानच्या आयॉलिम कासिमोवाला १०-७ ने पराभूत करत कांस्यपदक जिंकले आहे.
तसेच काल विनेश फोगटनेही रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. तिला ५० किलो फ्रीस्टाईल वजनी गटाच्या अंतिम सामन्यात चीनच्या चुन लीने २-३ असे पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे विनेशला या अटीतटीच्या लढतीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.
यामुळे आता आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या सहा झाली आहे. यात नवज्योतने सुवर्ण पदक, विनेशने रौप्य पदक तर साक्षी मलिक, संगीता, हरप्रीत सिंग आणि राजेंद्र कुमार यांनी कांस्य पदके मिळवली आहेत.