आयपीएल 2024 च्या 36व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने होते. या दोन संघांचा सामना आहे आणि त्यामध्ये काही वाद झाला नाही, असं होणं शक्यच नाही.
या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली ज्या प्रकारे बाद झाला, त्यावरून आता नवीन वाद उद्भवलाय. कोहली फुल टॉस चेंडूवर बाद झाला, ज्याला काही लोक ‘नो बॉल’ म्हणत आहेत. यावर आता लोकप्रिय समालोचक नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपलं मत व्यक्त केलं. सिद्धू म्हणाला की, मी छाती ठोकून सांगतो की तो नॉट आऊट आहे. त्यानं सांगितलं की जेव्हा चेंडू बॅटला लागला तेव्हा तो सुमारे दीड फूट उंच होता.
हर्षित राणानं स्वत:च्या गोलंदाजीत विराट कोहलीचा झेल घेतला. त्यानं हा चेंडू फुल टॉस टाकला होता. प्रथमदर्शनी तो ‘नो बॉल’ असल्याचं भासलं, परंतु जेव्हा तिसऱ्या अंपायरनं तपासलं तेव्हा तो चेंडू योग्य मानल्या गेला आणि कोहलीला बाद घोषित करण्यात आलं. ही घटना आरसीबीच्या डावाच्या तिसऱ्या षटकात घडली.
आता भारताचा माजी फलंदाज आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू यानं कोहलीच्या वादग्रस्त विकेटबद्दल बोलताना म्हटलं की, “मी छाती ठोकून सांगतो की तो नॉट आउट आहे. जेव्हा तो (बॉल) बॅटला लागतो तेव्हा तो किमान दीड फूट उंच होता. मला वाटतं हा नियम कोणत्याही किमतीत बदलला पाहिजे. या एका निर्णयानं या खेळाचा रंगच बिघडला आहे.”
विराट कोहली स्वतः त्याच्या विकेटवर नाखूष दिसत होता. आऊट झाल्यानंतर कोहली मैदानावर अंपायरशी वाद घालतानाही दिसला. पंचांच्या निर्णयानंतर कोहली संतप्त होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सनं 20 षटकांत 6 बाद 222 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरनं सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. याशिवाय फिल सॉल्टनं आक्रमक फलंदाजी करत 14 चेंडूत 48 धावा ठोकल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ 20 षटकांत 221 धावाच करू शकला. अशाप्रकारे आरसीबीचा अवघ्या 1 धावेनं पराभव झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
साल बदललं, खेळाडू बदलले, मात्र आरसीबीचं नशीब बदलेना! यावर्षी प्लेऑफसाठी पुन्हा जर-तरची परिस्थिती
बाद की नाबाद? आऊट दिल्यानंतर अंपायरवरच भडकला विराट कोहली, नो-बॉलवरून मोठा राडा!
रोमहर्षक सामन्यात आरसीबीचा अवघ्या एका रननं पराभव, केकेआरनं शेवटच्या चेंडूवर मिळवला विजय