इंडियन प्रीमियर लीग 2024 पूर्वी चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज समालोचक अशी ओळख नवजोत सिंग सुद्धू यांची आहे. असे असले तरी, मागच्या काही वर्षांमध्ये सुद्धू राजकारणात सक्रिय असल्यामुळे समालोचन करू शकले नाहीत. पण आगामी आयपीएल हंगामासाठी त्यांनी चाहत्यांना खास भेट दिली आहे.
आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी होणार आहे. लीगचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणार आहे. आयपीएल हंगामाला सुरुवात होण्याआधी स्टार स्पोर्ट्सकडून आनंदाची बातमी चाहत्यांना मिळाली. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवजोत सिंग सुद्धू (Navjot Singh Sidhu) आयपीएलमध्ये पुन्हा एकदा समालोचन करताना दिसणार आहेत. नुकतीच त्यांनी आगामी लोकसभा नविडणून न लढवण्याचा निर्णय देखील घेतला आहे.
नवजोत सिंग सुद्ध () काही वर्षांपूर्वी प्रोफेशनल क्रिकेटचा कॉमेंट्री बॉक्स चांगलाच गाजवला होता. समालोचनासाठी सिद्धू असल्यानंतर
सामना रंगतदार नसला, तरी प्रेक्षकांना कधीच कंटाळा येत नसे. कारण सिद्धूला आपल्या गमतीशीर बोलण्याने आणि अधून मधून केलेल्या शायरीमुळे चाहत्यांची नेहमीच पसंती मिळाली आहे. आगामी हंगामात देखील त्याच्या समालोचनामुळे सामन्याला अधिक रंग चढेलण्याची अफेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही माहिती चाहत्यांना दिली गेली.
A wise man once said, “Hope is the biggest ‘tope’”
And this wise man, the great @sherryontopp himself, has joined our Incredible StarCast! 👏
Don’t miss his incredible commentary (and gajab one-liners) in #IPLOnStar – STARTS MAR 22, 6:30 PM onwards, LIVE on Star Sports Network! pic.twitter.com/BjmFq9OKQ4
— Star Sports (@StarSportsIndia) March 19, 2024
लोकसभा निवडणुकीतून माघार
दरम्यान, सिद्धूंनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणून न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या पटिलाया लोकसभा मतदारसंघातून सिद्धूंना कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नीविरुद्ध निवडणून लढवाली लागणार होती, असे सांगितले जात होते. पण पत्नीच्या आजारपणामुळे सुद्धू ही निवडणून लढणार नाहीत. त्यांची पत्नी कॅन्सर पेशंट असून त्यांच्या उपचारासाठी सुद्धूंना वेळ हवा आहे. (Navjot Singh Sidhu will be doing commentary for Star Sports in IPL 2024)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मुंबईचा राजा संघात दाखल, पाहा व्हिडिओ
शिअरफोर्स आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग: भारती विद्यापीठ संघाने पटकावले विजेतेपद