---Advertisement---

इम्रान खानच काय, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरिफदेखील खेळायचे क्रिकेट

On: गुरूवार, जुलै 26, 2018 8:14 PM
---Advertisement---

बुधवारी (25 जुलै) पाकिस्तानमध्ये सार्वजनिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले होते. या निवडणूकीचा निकाल गुरवारी (26 जुलै) लागला. या निकालानुसार पाकिस्तानचे महान माजी कर्णधार इम्रान खान यांचे नाव पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून जाहिर झाले.

जशी इम्रान खान यांना क्रिकेटची पार्श्वभूमी आहे तसेच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचीही पार्श्वभूमी क्रिकेटची आहे. त्यांनीही व्यवसायिक क्रिकेट खेळले आहे. ते फलंदाज होते तसेच उजव्या हाताने फलंदाजी करायचे.

परंतू त्यांनी एकच प्रथम श्रेणी सामना खेळला आहे. हा सामना त्यांनी 1973-74 दरम्यान रेल्वेकडून पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स विरुद्ध खेळला. पण या सामन्यात त्यांना एकही धाव करता आली नव्हती. ते शुन्य धावेवर बाद झाले होते.

मात्र यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत 3 वेळा पाकिस्तानचे पंतप्रधानपद संभाळले. 68 वर्षीय शरिफ हे नोव्हेंबर 1990 ते जुलै 1993, फेब्रुवारी 1997 ते आॅक्टोबर 1999 या दरम्यान पंतप्रधान पद संभाळले.

त्यांनतर त्यांच्यावर बंदी आल्याने त्यांना सौदी आरेबियात पाठवण्यात आले. पण त्यानंतर पुन्हा 2007 ला परत येत त्यांनी पंतप्रधान पदासाठी 2013 ची निवडणूक जिंकत तिसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधानपद स्विकारले.

महत्त्वाच्या बातम्या:

कोणतेही डोके न वापरता वेळापत्रक बनवलं आहे, आशिया चषकाच्या तारखा बदला

वाचा- कोहली, धोनी आणि सचिनमध्ये कोण ठरले सर्वाधिक लोकप्रिय?

इम्रान खानने पाकिस्तान जिंकले, आता संभाळणार संसदेचे कर्णधारपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment