-आदित्य गुंड
जगात वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे क्रीडा स्पर्धांवरही परिणाम होताना दिसत आहेत. अमेरिकेत एनबीए, एमएलबी यांसारख्या मोठ्या स्पर्धांचे पूर्ण हंगाम स्थगित झाले आहेत. या स्पर्धांच्या विविध संघाचे अनेक कर्मचारी रोजंदारीवर काम करतात. घरच्या मैदानावर सामना असला की तिथे कामाला जायचं असा त्यांचा शिरस्ता. अनेकजण ताशी काम करणारे असतात. हाच त्यांच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत असतो.
आता अचानक हंगामच स्थगित झाल्याने हातावर पोट असलेल्या या कर्मचाऱ्यांचे वांदे होतील. मात्र असे होऊ नये म्हणून अनेक संघांनी आणि खेळाडूंनी पुढाकार घेतला आहे. अनेक संघ आपल्या कर्मचाऱ्यांना पगार सुरू ठेवणार आहेत. बऱ्याच खेळाडूंनी प्रत्येकी १००,००० डॉलर्स पासून जास्त रकमेची मदत जाहीर केली आहे.
https://www.instagram.com/p/B9srUU7pA3U/?igshid=5t91fcyhzxav
ट्रेंडिंग बातम्या-
–एकावेळी जडेजाशी पंगा घेणाऱ्या संजय मांजरेकरांची बीसीसीआयकडून हकालपट्टी!
– Blog: कोलकाता टेस्ट: अनेकांच्या लॅपटॉपमध्ये कायमची सेव्ह झालेली ती एक इनिंग
– ब्लाॅग: १४ मार्च २००१ – असे खेळले वीर हे दोन!!!