---Advertisement---

वर्ल्डकप वेळापत्रकानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली! वाचा नक्की काय घडले?

On: गुरूवार, जून 29, 2023 3:25 PM
---Advertisement---

भारतात होणाऱ्या 2023 वनडे विश्वचषकाच्या वेळापत्रकाची मंगळवारी (27 जून) घोषणा झाली. तब्बल 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत भारतातील दहा शहरांमध्ये सामने खेळले जाणार आहेत. पुणे येथील एमसीए स्टेडियम येथे या विश्वचषकातील पाच सामने खेळले जातील. यासोबतच मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर देखील उपांत्य फेरीच्या सामन्यासह पाच सामन्यांचे आयोजन केले जाईल. मात्र, या विश्वचषकासाठी नागपूरला यजमानपद न दिले गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विश्वचषक वेळापत्रक पुणे व मुंबई येथे प्रत्येकी पाच सामने खेळले जातील. मात्र, नागपूर येथील व्हीसीए स्टेडियमवर या विश्वचषकात एकही सामना खेळला जाणार नाही. त्यावर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख यांनी ट्विट केले. त्यांनी लिहिले,

 

‘वनडे विश्वचषकातील एकही सामना नागपूर येथे होणार नसल्याने आम्ही निराश झालो आहोत. आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. प्रशासनाने मुंबई व पुणे यांच्या पलीकडे जाऊन विदर्भाचा देखील विचार करावा. आमची बीसीसीआयला विनंती आहे की, काही सामने इथे देखील खेळवण्यात यावेत.’

याला प्रत्युत्तर देताना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी ट्विट करत लिहिले,

 

‘साहेब आपण विदर्भाची बाजू घेणं योग्यच आहे, पण खेळात कोणताही भेदभाव केला जात नाही. विदर्भात सामने होणार नसल्याची आपली नाराजी असली तरी आयसीसीच्या निकषाप्रमाणे 6 किंवा 8 ठिकाणीच सामने व्हायला पाहिजेत. पण आज बीसीसीआयने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे भारतात प्रत्यक्ष 10 ठिकाणी सामने तर 2 ठिकाणी सराव असे एकूण 12 ठिकाणी सामने होणार आहेत. देशातील स्टेडियमच्या संख्येचा विचार करता काही राज्यांवर नक्कीच अन्याय झाला असेल पण महाराष्ट्रात सर्वाधिक सामने होणार असल्याने याबाबत मी बीसीसीआय आणि आयसीसीचे महाराष्ट्राच्यावतीने आभारही मानले आहेत. हे सामने पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र येणार असून आपणही जरुर या!.’

1996 विश्वचषकानंतर प्रथमच पुण्यात विश्वचषकाचे सामने होणार आहेत. पुण्यापासून जवळच असलेल्या गहुंजे येथील एमसीए स्टेडियमवर हे सामने खेळले जातील.

(NCP Leader Anil Deshmukh And MCA President Rohit Pawar Twitter War Due To World Cup Timetable)

महत्वाच्या बातम्या –
“यंदा जडेजा वर्ल्डकपमध्ये युवीसारखी कामगिरी करेल”, दिग्गजाने व्यक्त केला विश्वास
आज मिळणार MPL चा महाविजेता! रत्नागिरी-कोल्हापूर अंतिम सामन्यात झुंजणार

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---