मुंबई | आज वानखेडेवर आयपीएल २०१८चा अंतिम सामना होत आहे. यामध्ये सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघ विजेतेपदासाठी लढणार आहे.
या सामन्यात सुरेश रैनाला आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पा पार करणारा पहिला खेळाडू बनण्याची संधी आहे. आज जर त्याने ४७ धावा केल्या तर इतिहासास घडणार आहे.
त्याने आजपर्यंत आयपीएलमध्ये १७५ सामन्यात ३४.३९ च्या सरासरीने ४९५३ धावा केल्या आहेत.
याआधी आयपीएलमध्ये 4000 किंवा त्यापेक्षा अधिक धावा विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, गौतम गंभीर, राॅबीन उथप्पा, शिखर धवन, एमएस धोनी आणि डेविड वार्नर या खेळाडूंनी केल्या आहे. यामध्ये वार्नर एकमेव परदेशी खेळाडू आहे.
आजच्या सामन्यात जर त्याने ४७ धावा केल्या तर आयपीएलमध्ये ५००० धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरणार आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
सुरेश रैना: 4953 धावा (सामने- 175)
विराट कोहली: 4948 धावा (सामने- 163)
रोहित शर्मा: 4493 धावा (सामने- 173)
गौतम गंभीर: 4217 धावा (सामने- 154)
राॅबीन उथप्पा: 4081 धावा (सामने- 163)
एमएस धोनी: 4016 धावा (सामने- 174)
डेविड वार्नर: 4014 धावा (सामने- 114)
महत्त्वाच्या बातम्या-
-तर धोनी करणार ४८ तासांत तो विक्रम आपल्या नावावर!
–एबी डिव्हिलियर्सच्या नावाने कुणी दिली शेगांव संस्थानला देणगी?
–२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल!
-Breaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो!
–१८ वर्षापूर्वी गांगुली आणि द्रविडने रचला होता हा ‘दादा’ विक्रम