कटक। ‘मी वनडे क्रिकेट खेळू शकतो हे जगाला नाही तर स्वत:ला सिद्ध करून दाखवायचे आहे,’ असे भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) म्हटले आहे. भारत विरुद्ध विंडीज संघात पार पडलेल्या सामन्यात भारताने सामना जिंकल्यानंतर तो बोलत होता.
रविवारी (22 डिसेंबर) भारत विरुद्ध विंडीज संघात (India vs Windies) पार पडलेला तिसरा आणि शेवटचा वनडे सामना भारताने 4 विकेट्सने जिंकला. या सामन्यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) यांनी शेवटच्या षटकात उत्कृष्ट कामगिरी करत भारताला मालिका जिंकून देण्यात खारीचा वाटा उचलला आहे.
“मला स्वत:ला सिद्ध करून दाखवायचे होते की मी आताही मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळू शकतो. मला जगातील कोणालाही काही सिद्ध करून दाखवायचे नव्हते,” असे सामन्यानंतर जडेजा म्हणाला.
“ही खेळी खूप महत्त्वाची होती कारण हा निर्णायक सामना होता. खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप चांगली होती. आम्हाला फक्त चेंडू पाहून खेळायचे होते,” असे आपल्या खेळीबद्दल जडेजा म्हणाला.
“मी या वर्षी जास्त वनडे क्रिकेट खेळलो नाही. परंतु, जेव्हा मला गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्याची जबाबदारी मिळाली तेव्हा मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे,” असेही जडेजा यावेळी म्हणाला.
“शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणे महत्त्वाचे होते. आम्हाला माहिती होते की हा सामना आम्हीच जिंकणार,” असेही जडेजा म्हणाला.
जडेजाने मान्य केले की भारतीय संघाला क्षेत्ररक्षणावर मेहनत घ्यावी लागणार आहे.
“या मालिकेत बरेच झेल सुटले. आमच्या क्षेत्ररक्षणाची पातळी पाहता असे व्हायला नको होतं. संध्याकाळच्या वेळेला प्रकाशाच्या कमतरतेमुळे असे होत असते. झेल सुटण्याचा परिणाम सहन करावा लागतो. पुढील मालिकेत यावर लक्ष द्यावं लागेल,” असे जडेजा म्हणाला.
भारताचे ४ असे गोलंदाज, ज्यांनी फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले होते
वाचा👉https://t.co/is50gOoDi1👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #INDvWI— Maha Sports (@Maha_Sports) December 23, 2019
'कॅप्टन' कोहलीने शार्दुल ठाकूरचे केले चक्क मराठीत कौतुक; चाहत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया
वाचा👉https://t.co/40kvn8JjWl👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #INDvWI #ViratKohli #ShardulThakur— Maha Sports (@Maha_Sports) December 23, 2019