दिल्लीतील जंतर-मंतर या ठिकाणी रविवारी (28 मे) दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंविरोधात मोठी कारवाई केली. रविवारी दिल्लीत नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मागच्या सुमारे महिनाभरापासून भारतीय कुस्तीपटू कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरन सिंग यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. अशात नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी त्याठिकामी मोर्चा नेण्याचे कुस्तीपटूंनी ठरवले होते. मात्र, पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. यादरम्यान या कुस्तीपटूंना अतिशय अमानुषपणे त्या ठिकाणावरून हटवले गेले. यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली.
जंतर-मंतर ते नवी संसद असा शांततेत मोर्चा कुस्तीपटूंनी काढला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांना तिथपर्यंत जाऊ न देता स्थानबद्ध केले. दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कुस्तीपटूंमध्ये विनेश फोगाट, साक्षी मलिक, संगीता फोगाट आणि बजरंग पुनिया या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्लांचीही नावे आहेत. पोलीस कर्मचारी आणि कुस्तीपटूंमध्ये हातापाई झाल्याचेही पाहायला मिळाले. यावेळी कुस्तीपटूंच्या समर्थनात आलेल्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. या खेळाडूंवर एफआयआर देखील दाखल करण्यात आले आहे.
https://twitter.com/boxervijender/status/1662757703448670208?t=Wjk-FeXvxY6d2AXyieBblw&s=19
या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 2008 बीजिंग ओलंपिक मध्ये कांस्यपदक मिळवलेल्या बॉक्सर विजेंदर सिंग याने व 2021 टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भालाफेकपट्टू नीरज चोप्रा याने ट्विट करत खेळाडूंना योग्य वागणूक मिळावी अशी मागणी केली. तसेच सोशल मीडियावर या खेळाडूंना मोठ्या प्रमाणात समर्थन प्राप्त होत आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात हे सर्वजण आंंदोलन करत आहेत. आपल्या पदाचा गैरवापर करून बृजभूषण यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंकडून केले गेले आहेत. सिंग यांना अटक होईपर्यंत आपण आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले.
(Neeraj Chopra And Vijender Singh Come Forward To Support Wrestler Protest)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावसाने केले क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे पाणी-पाणी! जगभरातील चाहते फायनल न पाहताच परतले माघारी
“तुम्ही वडिलांच्या गळ्यात हात टाकता का?”, हार्दिकच्या कृतीवर गावसकरांची संतप्त प्रतिक्रिया