कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह देशातील काही मोठ्या कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंग यांच्यावर मोठे आरोप केले. भारतीय कुस्ती महासंघाचे (IWF) अध्यक्ष बृजभूषण सिंग (WFI President BrijBhushan Sharan Singh) यांच्याकडून आजपर्यंत अनेक महिला खेळाडू आणि प्रशिक्षकांचे लैंगिक शोषण केले गेले असल्याचे आरोप त्यांच्यावर केले गेले. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन याविषयी चौकशी करत आहे. अशातच आता आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंच्या अडचणीही वाढताना दिसत आहेत.
विनेश फोगट (Vinesh Phogat), साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांच्यासह देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंग (BrijBhushan Singh) यांच्याविरोधात आवाज अठवल्यानंतर ते चांगलेच अडचणीत आल्याचे दिसत आहे. कस्तीपटूंच्या आरोपानंतर कुस्ती महासंघावर स्थगिती लावली गेली आहे. भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्या अडचणी या प्रकरणानंतर वाढल्या असल्या, तरी आता आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंसोबत देखील असेच काहीसे होताना दिसत आहे. या कुस्तीपटूंविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली आहे.
न्यायलयात दाखल केल्या गेलेल्या याचित असे म्हटले गेले आहे की, बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि इतर कुस्तीपटूंनी कायद्याचा गैरउपयोग केला आहे. यासाठी या कुस्तीपटूंविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने द्वावे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. वकील शारिकसंत प्रसाद यांच्याकडून ही याचिका दाखल केल्यानंतर त्यांनी याचिकाकर्त्याचे नाव विकी असे सांगितले. विकी खासदात बृजभूषण सिंग याच्या घरी राहत असून त्यांचा कुक आहे. विकीच्या मते आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंगांची प्रतिमा मलीन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
न्यायलयात दाखल केल्या गेलेल्या याचिकेत म्हटले गेले आहे की, “कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण कायद्याचा गैरउपयोग केला आहे. जर कोणाचे लैंगिक शोषण झाले असेल तर पोलीस आणि न्यायलयाच्या माध्यमातून कारवाई केली पाहिजे होती.” (court petition filed against the wrestlers who accused Brijbhushan Singh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“सूर्या आणि बटलर कुठेही धावा करू शकतात,” स्वतः दिग्गज गोलंदाजानेच केलं कौतुक
क्या बात है! अचानक पुनरागमन करताच जडेजाच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, वाचा सविस्तर