Neeraj Chopra Birthday: भारतात भालाफेकीचा खेळ प्रसिद्ध करण्याचे श्रेय जर कोणत्याही खेळाडूला जात असेल तर ते फक्त नीरज चोप्राचं आहे. दोन ऑलिम्पिक पदके जिंकून त्याने भारतातील प्रत्येक घराघरात भाला पोहोचवला. आज जविलनने भारतीयांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. नीरजने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य आणि टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. भालाफेकीत दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे.
नीरज चोप्राचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणातील पानिपत जिल्ह्यात झाला. तो आज 27 वर्षांचा झाला असून तो आपला वाढदिवस साजरा करत आहे. 27 वर्षांच्या होण्याआधीच, या अनुभवी भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलीटने आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत. ऑलिम्पिक व्यतिरिक्त त्याने आशियाई आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये पदकेही जिंकली आहेत. डायमंड लीगचे विजेतेपदही त्याने जिंकले आहे. नीरजने 2012 आणि 2014 मध्ये अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आणि त्याच्या खेळातील कामगिरीच्या जोरावर तो 2016 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाला. त्याची सध्या सुभेदार मेजर म्हणून नियुक्ती झाली असून तो आपली जबाबदारी पार पाडत आहे.
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकले. वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो अभिनव बिंद्रानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. यानंतर, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये जरी त्याने सुवर्ण जिंकले नसले तरी त्याने देशासाठी रौप्य नक्कीच जिंकले. या ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम पहिला आणि नीरज दुसरा राहिला. अर्शदने 92.97 मीटर फेक केली होती. तर नीरजचा सर्वोत्तम थ्रो 89.94 आहे. तेव्हा नीरजच्या आईने सांगितले होते की, नीरज असो की अर्शद यांनी सुवर्णपदक जिंकले हे दोघेही तिचेच मुले आहेत.
नीरज चोप्राने 2022 मध्ये डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले होते. परंतु या वर्षी तो डायमंड लीगच्या अंतिम फेरीत ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सच्या मागे दुसऱ्या स्थानावर राहिला. 2023 मध्येही तो दुसऱ्या क्रमांकावर होता. आजवर खेळल्या गेलेल्या प्रत्येक मोठ्या स्पर्धेत त्याने जेतेपदे जिंकून भारतातील लोकांना आनंद दिला आहे. तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात खेळत असला तरी त्याने तिरंगा फडकवला आहे. आता त्याचे टार्गेट 90 मीटरपेक्षा जास्त फेक करण्याचे असेल, कारण त्याला ते आतापर्यंत करता आलेले नाही.
हेही वाचा-
IND vs AUS: मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया किती मजबूत? मागील दोन दाैऱ्यात भारताचा दबदबा
विराट कोहली ऑफ स्टंप लाईनवर वारंवार आऊट का होतो? कर्णधारानं दिलं मजेशीर उत्तर
कुलदीप, अक्षरच्या आधी तनुष कोटियनचा टीम इंडियात का प्रवेश? रोहित शर्माने सांगितले मोठे कारण