ऑलिंपिक 2021 भारतीय चाहत्यांचा नेहमीच लक्षात राहिल. यामध्ये नीरज चोप्राने कोट्यवधी भारतीयांची मान उंचावली होती. तब्बल 121 वर्षानंतर नीरज चोप्राने ऑलिंपिक स्पर्धेत ॲथलेटीक्समध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते. हा कारनामा त्याने 2021 टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत केला होता. गोल्डन बॉय नीरज चोप्रा 24 डिसेंबर रोजी आपला 25वा वाढदिवस साजरा करतोय. (Neeraj Chopra birthday special)
नीरज चोप्राचा (neeraj Chopra) जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावात, एका शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला होता. टोकियो ऑलिंपिक 2021 स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात त्याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर त्याने ‘गोल्डन बॉय’ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. हे वास्तव आहे परंतु भूतकाळ काहीतरी वेगळाच आहे.
आज फिट आणि हँडसम दिसणारा नीरज चोप्रा बालपणी असा नव्हता. तेव्हा तो खूप लठ्ठ होता. ज्यामुळे त्याची खिल्ली देखील उडवली जायची. ज्यामुळे कुटुंबियातील सदस्यांना त्याची चिंता वाटायची. वजन घटवायचे म्हणून त्याचे काका त्याला स्टेडियममध्ये धावण्यासाठी घेऊन जायचे. परंतु त्या गोष्टीत त्याचे मन लागत नव्हते. त्यावेळी त्याने काही खेळाडूंना भाला फेकताना पाहिले. त्याच वेळी त्याला वाटलं की, आपण ही हेच केलं पाहिजे. (Tokyo Olympic 2021)
नीरज चोप्रा भालाफेककडे भविष्य म्हणून पाहू लागला होता. त्यानंतर त्याने मेहनत घेतली आणि जिद्दीने जे काही मिळवलं ते संपूर्ण जगाने पाहिले. तो भालाफेकमध्ये नवा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता ठरला आहे. तो पहिलाच भारतीय ॲथलिट ठरला आहे ज्याने ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. ही स्पर्धा 2020मध्ये होणार होती, मात्र ती 2021मध्ये पार पडली. (unknown facts about neeraj Chopra)
नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिकमध्ये 87.58 मीटर अंतर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले होते. ऑलिम्पिक इतिहासात वैयक्तिकरित्या कोणत्याही भारतीयाने जिंकलेले हे दुसरे सुवर्णपदक आहे. ऑलिंपिक पदक जिंकल्यानंतरही त्याचे पाय जमिनीवरच आहेत. ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान त्याच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणाऱ्या जर्मन प्रशिक्षक क्लॉस बार्टोनिएझ यांच्यासोबत त्याचे पुढील प्रशिक्षण सुरू आहे.
नीरजने 2022मध्ये जागतिक ॲथलेटीक्स चॅम्पियनशीपमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले. त्या स्पर्धेत त्याने 88.13 मीटर अंतर भाला फेकला होता. भारताचे हे या स्पर्धेतील दुसरेच पदक ठरले होते. 2003मध्ये अंजू बॉबी जॉर्जने लांब उडीत कांस्य पदक जिंकले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबाद एफसीची पुन्हा अव्वल स्थानी झेप; बंगळुरू एफसी घरच्या मैदानावर अपयशी
आता रूटही दिसणार आयपीएलच्या रणांगणात! राजस्थानने करोडो मोजत केली स्वप्नपूर्ती