टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा काही दिवसांपूर्वीच समाप्त झाली आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. तसेच नीरज चोप्राने ट्रॅक अँड फील्ड इव्हेंटमध्ये भारताला तब्बल १०० वर्षानंतर सुवर्णपदक मिळवून दिले होते. ज्यामुळे संपूर्ण भारतभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. दरम्यान महाराष्ट्रातील पुणे शहरात नीरज चोप्राच्या नावाने स्टेडियम बनवण्यात आले आहे.
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात ८७.५८ मीटर लांब भाला फेकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. या सुवर्ण कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून नीरजवर बक्षिसांचा वर्षाव केला गेला होता.
आता पुण्यामध्ये त्याच्या नावाने स्टेडियम सुरू करण्यात आले आहे. या स्टेडियमचे नाव ‘नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्युट, पुणे छावणी’ असे ठेवण्यात आले आहे.शुक्रवारी (२७ ऑगस्ट) रक्षामंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी भारतीय सेना प्रमुख जनरल एमएस नरवने आणि नीरज चोप्रा देखील उपस्थित होते.
आपले नाव स्टेडियमला दिले जाणे ही एका खेळाडूसाठी सर्वात मोठी गोष्ट असते. त्यामुळे नीरज चोप्राला देखील हा सन्मान मिळाल्यानंतर तो खूप खुश झाला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. त्याने या फोटोवर कॅप्शन देत लिहिले की, “मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो की,मला हा सन्मान मिळाला.मी अशी आशा व्यक्त करतो की, या स्टेडियममध्ये सराव करणारे खेळाडू चांगला सराव करून स्वतःचे आणि देशाचे नाव उंचावतील.”(Neeraj chopra Instagram post went viral on social media)
https://www.instagram.com/p/CTFKgL3Kqi8/?utm_medium=copy_link
भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. या स्पर्धेत भारताच्या पदरी ७ पदक आले.ही भारताकडून ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत केलेली सर्वोत्तम कामगिरी होती. भारताकडून नीरज चोप्रा, मीराबाई चानु, पीव्ही सिंधू, रवी दहिया, लवलिना बोरगोहेन,बजरंग पुनिया आणि भारतीय संघाला या स्पर्धेत पदक जिंकण्यात यश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
एका तपानंतर ख्रिस्टीआनो रोनाल्डो पुन्हा खेळणार मँचेस्टर युनायटेडसाठी
रोहित रिव्ह्यू सिस्टीम! हिटमॅनच्या ‘त्या’ निर्णयाने मिळाले केएल राहुलला जीवदान
Video: हिटमॅनचा नजाकतदार ‘अपर कट’ पाहून येईल सचिन आणि वीरूची आठवण