एशियन गेम्समध्ये नीरज चोप्रा हा सुवर्णपदक मिळवणारा भारताचा पहिला भालाफेकपटू ठरला आहे. त्याने तिसऱ्या प्रयत्नात वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत 88.06मीटरचा थ्रो केला.
20 वर्षीय नीरजने युट्युबवर जॅन झेलेझ्ने यांचे व्हीडियो बघून भालाफेक हा खेळ शिकला आहे. जॅन हे झेकोस्लोवाकियाचे भालाफेकपटू असून ते ऑलिंपिक, वर्ल्ड चॅम्पियन आहेत. तसेच नीरजने ऑस्ट्रेलियाच्या गॅरी कॅलवर्ट यांच्याकडूनही प्रशिक्षण घेतले आहे.
हरियाणामधील खांड्रा या गावात शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या नीरजला गावातील काही लोकांचे भालाफेकीतील कौशल्य बघून याची आवड निर्माण झाली. त्याने पंचकुला येथे असलेल्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडीया सेंटरच्या ताऊ देवी लाल स्टेडियममध्ये सुरूवातीला चार वर्ष सराव केला.
याआधी निरजने यावर्षी गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली होती. तसेच त्याने 2016ला पोलंडला झालेल्या वर्ल्ड ज्यूनियर चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक मिळवले होते.
भालाफेकीत भारताचे हे दुसरे पदक असून याआधी भारताकडून 1982 च्या एशियन गेम्समध्ये गुरतेज सिंगने भालाफेकीतील पहिले पदक मिळवून दिले होते. त्यांनी भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर भालाफेकीत नीरजने पहिल्यांदा भारताला पदक मिळवून दिले आहे.
तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारा नीरज चौथाच अॅथलिट आहे. मिल्खा सिंग ( 440 यार्ड, कार्डिफ, 1958), क्रृष्णा पुनिया ( थाळीफेक, दिल्ली, 2010), विकास गौडा ( थाळीफेक, ग्लासगो, 2014)
नीरजने जर अशीच कामगिरी सुरू ठेवली तर तो 90 मीटरपर्यंतही जाऊ शकतो. तसेच त्याने जर्मनीच्या वेर्नर डॅनियलच्या प्रशिक्षणाखालीच सराव केला तर तो 2020च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये त्याला फायदाच होईल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: भारताच्या महिला, पुरुष संघाना तिरंदाजीत रौप्यपदक
–एशियन गेम्स: पीव्ही सिंधूचे ऐतिहासिक सुवर्ण हुकले, रौप्यपदकवार मानावे लागले समाधान