---Advertisement---

‘प्रत्येक खेळाडूचा दिवस…’, नीरज चोप्रा ‘सिल्व्हर’ जिंकल्याने दुःखी? पाहा पहिली प्रतिक्रिया आली समोर

---Advertisement---

नीराज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरजने दुसरे स्थान पटकावल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी नीरजने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्याचा आनंद नाही का? पदक जिंकल्यानंतर नीरजची प्रतिक्रिया समोर आली आहे. नीरज म्हणाला की, प्रत्येक खेळाडूचा दिवस असतो.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर एएनआयशी बोलताना नीरज चोप्रा म्हणाला, “ही स्पर्धा विलक्षण होती. प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा दिवस असतो, आज अर्शदचा दिवस होता.  मी माझे सर्वोत्तम दिले, परंतु काही गोष्टी आहेत ज्याकडे लक्ष देणे आणि काम करणे आवश्यक आहे, जरी आज आमचे राष्ट्रगीत वाजले नाही तरी ते भविष्यात नक्कीच वाजवले जाईल.

याशिवाय नीरजने सुधारणांबाबतही सांगितले. नीरज पुढे म्हणाला, “आम्ही जेव्हा कधी देशासाठी पदक जिंकतो, तेव्हा आम्हा सर्वांना आनंद होतो. पण आता थ्रो सुधारण्याची वेळ आली आहे. मला दुखापतींवर काम करावे लागेल. त्यासोबतच उणिवा सुधारून चांगली कामगिरी करुन दाखवावे लागेल.

नीरज चोप्राने 89.45 मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले. हा नीरजची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. याच स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले. अर्शदने 92.97 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. अर्शदचा हा थ्रो ऑलिम्पिक विक्रमही ठरला. याशिवाय ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स स्पर्धेत तिसरा राहिला, त्याने कांस्यपदक जिंकले. अँडरसन पीटर्सने 88.54 मीटरची थ्रो केली. तथापि, नीरज चाैप्राच्या या पदकमुळे भारताला आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकमधून एकूण 5 पदके मिळाली आहेत.

हेही वाचा-

अफाट साैंदर्य पडलं महागात, जलतरणपटूला सुंदर असल्याकारणानं ऑलिम्पिमधून पडावं लागलं बाहेर
हक्काचं ‘सुवर्ण’ थोडक्यात हुकलं, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये नीरजची राैप्य पदकाची कमाई
कुस्तीत भारताच्या पदरी पुन्हा निराशा, स्टार पैलवानाचा सेमीफायनलमध्ये पराभव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---