---Advertisement---

ब्रेकिंग! भारताच्या सुवर्ण आशांना सुरुंग! ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची कॉमनवेल्थमधून माघार

---Advertisement---

इंग्लंडमधील बर्मिंघम शहरात २८ जुलैपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय पथक इंग्लंडमध्ये पोहोचले आहे. तसेच काही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत असल्याने तेथे उशिरा दाखल होतील. या दरम्यानच भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर येतेय. सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार भालाफेकपटू व ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा हा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. विशेष म्हणजे नुकतेच नीरजने जागतिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.

टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावत नीरज रातोरात स्टार झाला होता. त्यानंतर यावेळी पुन्हा एकदा त्याच्याकडून राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची अपेक्षा देशवासियांना होती. अवघ्या दोन दिवसापूर्वीच वर्ल्ड ऍथलेटिक्समध्ये त्याने रौप्य पदक आपल्या नावे केले होते.

https://twitter.com/WeAreTeamIndia/status/1551822219088580609?t=shJ84wd3mAzzMeAVeC69og&s=19

भारतीय पथकाकडून नीरज राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे ट्विट करण्यात आले. तसेच, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी देखील या बातमीची पुष्टी केली. ते म्हणाले, “नीरजने अमेरिकेतून मला दूरध्वनीद्वारे सांगितले आहे की, मी राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्याला तंदुरुस्तीची समस्या जाणवतेय. तो पूर्ण तंदुरुस्त नसल्याने स्पर्धेत भाग घेऊ इच्छित नाही.” नीरजने २०१८ गोल्ड क्वेस्ट राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेले. त्यामुळे यावेळी तो सुवर्णपदक राखण्यासाठी मैदानात उतरणार होता. मात्र, आता असे घडू शकणार नाही.

‌‌नीरज २८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक असणार होता. त्याच्या अनुपस्थितीत आता कोण ही जबाबदारी सांभाळेल, याबाबत खुलासा झाला नाही. तसेच नीरज भारताचे प्रतिनिधित्व करणार नसल्याने दुसरा भालाफेकपटू रोहित यादव याला त्याच्याा जागी संधी दिली जाऊ शकते. रोहित याने देखील नुकतीच नीरजसह वर्ल्ड ऍथलेटिक्सची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्याला पदक मिळवण्यात अपयश आले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

तेव्हा नक्की असं काय घडलं की, द्रविडला वाटला होता कमीपणा 

श्रेयस अय्यरला घ्यायचीये विराटची जागा! स्वत:च व्यक्त केली इच्छा 

श्रेयस अय्यरबद्दल ‘ती’ कमेंट करणे न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूच्या अंगाशी, सारखा वाजतोय फोन! 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---