सध्या हंगरीची राजधानी बुडापेस्ट याठिकाणी जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू आहे. भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा याने जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शुक्रवारी (25 ऑगस्ट) अंतिम सामन्यात धडक दिली. सोबतच पॅरिस ऑलिम्पिकसाठी देखील पात्र झाला आहे. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर भाला फेकला आणि अंतिम सामन्यात धडक दिली.
मागच्या वेळी ऑलिम्पिक स्पर्धा टोकियोमध्ये खेळल्या गेल्या होत्या. नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यामध्ये सुवर्ण पदक विजेता ठरला होता. आता नीरज जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) विजेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. अंतिम सामना 27 ऑगस्ट रोजी पार पडेल. भारतीय वेळेनुसार अंतिम फेरीला रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल. मागच्या वेळी जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज या स्पर्धेत रौप्य पदक विजेता ठरला होता.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी काय केले?
नीरज चोप्रा याने जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शुक्रवारी (25 ऑगस्ट) पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर फाला फेकला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. पुढच्या वर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी खेळाडूंना 85.50 मीटर भाला फेकावा लागणार आहे. नीरजने शुक्रवारी ही कामगिरी केली आणि ऑलिम्पिकसाठी आपली जागा पक्की केली. त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन 89.94 मीटर आहे, जे त्याने जून 2022मध्ये डायमंड लीगदरम्यान केले होते. (Neeraj Chopra’s entry into the finals of World Athletics Championships also qualifies for the Paris Olympics.)
महत्वाच्या बातम्या –
राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत नवव्या फेरी अखेर सेतुरामन एसपी आघाडीवर
ब्रेकिंग: WWE चॅम्पियन ब्रे व्हाईटचे आकस्मिक निधन, वयाच्या 36 व्या घेतला अखेरचा श्वास