---Advertisement---

न्यूझीलंडचा ‘हा’ गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर, पाय फ्रॅक्चर झाला असूनही केलं होतं गोलंदाजीचं धाडस 

On: गुरूवार, डिसेंबर 31, 2020 2:16 PM
---Advertisement---

नुकत्याच न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या लढतीत न्यूझीलंडने १०१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर दोन्ही संघ दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तयारीला लागले आहेत. अशात न्यूझीलंड संघाला मोठा झटका बसला आहे. त्यांचा दिग्गज वेगवान गोलंदाज निल वॅगनर दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पायाचा अंगठा तुटलेला असूनही त्याने गोलंदाजी केली होती.

न्यूझीलंड संघाचो प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी वॅगनरच्या दुखापतीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “निल वॅगनर हा खूप शानदार गोलंदाज आहे. त्याने जे काही केले, ते दुसरे कोणच करु शकणार नाही. तो पुढील सहा आठवड्यांसाठी संघाबाहेर झाला आहे. लवकरच आम्ही त्याच्या बदली खेळाडूची घोषणा करणार आहोत.”

शाहीन आफ्रिदीमुळे झाली होती दुखापत

बे ओव्हल स्टेडियम येथे झालेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत प्रथम फलंदाजी करताना यजमान न्यूझीलंड संघाने ४३१ धावा केल्या होत्या. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (२७ डिसेंबर) वॅगनर अंतिम षटकात फलंदाजी करत होता. यादरम्यान पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा एक यॉर्कर वॅगनरच्या उजव्या पंज्याला लागला.

त्यामुळे पाकिस्तानच्या पहिल्या डावाच्या सुरुवातीच्या षटकात तो गोलंदाजी करू शकला नाही. पण दुसऱ्या दिवसाखेर त्याने तीन षटके गोलंदाजी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर वॅगनरच्या पंज्याचा स्कॅन करण्यात आला, ज्यामध्ये त्याचा पंजा फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले. मात्र त्याची दुखापत जास्त गंभीर नसल्याने डॉक्टरांनी त्याला गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला.

दुखापती असूनही गोलंदाजी करत घेतल्या दोन विकेट्स

त्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वॅगनरने दुखापतीचा विचार न करता गोलंदाजी करण्याचे धाडस केले. विशेष म्हणजे, पूर्ण दिवसात त्याने १८ षटके गोलंदाजी करताना संघाला २ महत्त्वपुर्ण विकेट्सही मिळवून दिल्या. पाकिस्तानी क्रिकेटपटू फवाद आलम याला अवघ्या ९ धावांवर; तर शाहीन आफ्रिदीला फक्त ६ धावांवर बाद करण्याचा पराक्रम वॅगनरने केला होता.

कसोटी कारकिर्दीत गाठलाय २९५ विकेट्सचा टप्पा

३५ वर्षीय डावखुरा गोलंदाज वॅगनर गेल्या आठ वर्षांपासून न्यूझीलंड कसोटी संघाचे प्रतिनिधित्त्व करत आहे. नुकताच त्याने कसोटी कारकिर्दीतील ५० सामन्यांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान २६.३३च्या सरासरीने त्याने २१९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांमध्ये त्यांची गणना केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या-

हिम्मत असावी तर अशी! पाय फ्रॅक्चर झाला असूनही ‘या’ दिग्गजाने केली गोलंदाजी, सर्वत्र होतंय कौतुक

अटीतटीच्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

भारतीय महिला संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला कोरोनाचा फटका, २०२२ पर्यंत मालिका स्थगित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---