---Advertisement---

भीमपराक्रम! युवराजचा वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड 16 वर्षांनी उद्ध्वस्त, नेपाळच्या पठ्ठ्याने केली डेरिंग; वाचाच

On: बुधवार, सप्टेंबर 27, 2023 10:30 AM
Kushal-Malla
---Advertisement---

बुधवारचा (दि. 27 सप्टेंबर) दिवस नेपाळ क्रिकेट संघासाठी ऐतिहासिक ठरला. नेपाळ संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये क्रिकेट खेळातील पहिल्याच सामन्यात मंगोलियाचा 273 धावांनी पराभव केला. या सामन्यात संघाच्या दोन खेळाडूंनी शतक आणि अर्धशतकांचा विश्वविक्रम मोडीत काढला. फलंदाज कुशल मल्ला याने 34 चेंडूत सर्वात वेगवान शतक ठोकले. तसेच, दीपेंद्र सिंग एरी याने भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज युवराज सिंग याचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम मोडला.

खरं तर, युवराज सिंग (Yuvraj Singh) याने पहिल्या-वहिल्या टी20 विश्वचषक 2007मध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम केला होता. त्याने फक्त 12 चेंडूत अर्धशतक केले होते. हा तोच सामना होता, ज्यात युवराजने स्टुअर्ट ब्रॉड याच्या एकाच षटकात 6 षटकार मारले होते. युवराज सिंगचा हा विक्रम 16 वर्षे कायम होता. मात्र, आता हा विक्रम उद्ध्वस्त झाला आहे.

दीपेंद्र सिंगचा कहर
नेपाळ संघाच्या दीपेंद्र सिंग एरी (Dipendra Singh Airee) याने अवघ्या 9 चेंडूत अर्धशतक ठोकले आणि युवराजचा विश्वविक्रम मोडीत काढला. त्याने सामन्यात एकूण 10 चेंडूंचा सामना केला. यावेळी त्याने 8 षटकार मारत 52 धावा चोपल्या. यावरून समजते की, दीपेंद्रने किती उच्च दर्जाची विस्फोटक फलंदाजी केली आहे.

नेपाळ संघाने उभारली सर्वात मोठी धावसंख्या
कुशल मल्ला (137) आणि दीपेंद्र सिंगच्या या प्रदर्शनामुळे नेपाळ संघाने टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्याही उभारली. नेपाळने निर्धारित 20 षटकात 314 धावा केल्या. टी20 क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. आजपर्यंत कुठल्याच संघाला टी20 इतिहासात 20 षटकात एवढ्या धावा करता आल्या नव्हत्या. इतकंच नाही, तर कुठलाही संघ 300 धावांना स्पर्शही करू शकला नव्हता. मात्र, नेपाळने सर्व विक्रम मोडीत काढले. नेपाळकडून मल्लाने 50 चेंडूत 8 चौकार आणि 12 षटकारांच्या मदतीने 137 धावांची खेळी साकारली. त्याने फक्त 34 चेंडूत शतक ठोकले. हे टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक आहे. (nepal dipendra singh airee breaks former cricketer yuvraj singh fastest t20i fifty record)

हेही वाचा-
बाबो…नेपाळचा कहर! 20 षटकात 300पेक्षा जास्त धावा चोपत घडवला इतिहास, रोहितचा वेगवान शतकाचा रेकॉर्डही तुटला
विश्वचषक संघातून तमिम इकबालचा पत्ता कट, शाकिब करणार बांगलादेशचे नेतृत्व, ‘असा’ आहे संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---