---Advertisement---

Video: अर्जुनची धोनीसारखी विकेटकीपिंग पाहिली का? केले दोन भन्नाट रनआउट

Arjun Saud
---Advertisement---

स्टम्पच्या मागे सामन्याचे चित्र पालटणारा भारताचा माजी कर्णधार-फलंदाज एमएस धोनी अशी त्याची ओळख. त्याच्या फलंदाजीबरोबरच विकेटकीपिंगचेही चाहते मोठ्या प्रमाणात आहे. तो क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम विकेटकीपरपैकी एक आहे. यष्टीरक्षणात त्याच्यासारखे कौशल्य दाखवण्याचा प्रत्येक युवा खेळाडूचा प्रयत्न असतो. नेपाळच्या खेळाडूनेही त्याच्या अफलातून विकेटकिपींगने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याने केलेल्या अप्रतिम विकेटकीपिंगचे व्हिडियो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.

नेपाळचा विकेटकीपर अर्जुन सौद (Arjun Saud) याने स्थानिक टी20 लीगमध्ये खेळताना दोन खेळाडूंना उत्तमरित्या धावबाद केले. हा सामना बिराटनगर सुपरकिंग्ज विरुद्ध जनकपुर रॉयल्स यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये सौदने सुपर किंग्जकडून खेळत होता. त्याने रॉयल्सच्या संदीप जोरा आणि राजेश पुलमी यांना धावबाद केले. त्याने पूर्णपणे हवेत सूर मारत आणि स्टम्पकडे न पाहता अशाप्रकारे या दोन खेळाडूंना बाद केले. त्याच्या या कौशल्याची तुलना धोनीशी केली जात आहे.

एमएस धोनी (MS Dhoni) याने 2016च्या टी20 विश्वचषकात बांगलादेशच्या एका खेळाडूला असेच जबरदस्त बाद केले होते. ते सर्वाधिक व्हायरल झाले होते. चाहते आजही त्याचे कौतुक करतात.

सौदने नेपाळकडून आतापर्यंत 7 वनडे आणि तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो सलामीला फलंदाजी देखील करतो. फलंदाजीत त्याला हवे तसे यश मिळाले नाही, मात्र विकेटकिपींग करताना तो चर्चेत येत आहे.

नेपाळ टी20 लीगमध्ये सहा संघ आहेत. ही स्पर्धा 24 डिसेंबरपासून सुरू झाली असून त्याचा शेवटचा सामना 11 जानेवारीला खेळला जाणार आहेत. या स्पर्धेत एकूण 34 सामने खेळले जाणार आहेत. या लीगमध्ये भारताचा 19 वर्षाखालील विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद देखील आहे. त्याने मागील वर्षीच भारताच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अमेरिकेत खेळण्यास गेला. Nepal Wicketkeeper Arjun Saud two insane run outs in t20 match video goes viral

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेविरुद्ध रिषभ पंतला का संधी मिळाली नाही? कारण आले समोर
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजासाठी वर्षाचा शेवट आंबट-गोड! आयपीएल लिलावामध्ये कमावले कोटी, आता दुखापतीमुळे…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---