क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी नेपाळचा फिरकीपटू संदीप लामिछाने याच्याशी संबंधित आहे. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी संदीपने क्रिकेट कारकीर्द आणि आयुष्यात भरपूर काही पाहिलं आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात संदीपवर एका अल्पवयीन मुलीवर बला’त्कार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. यानंतर बोर्डाने त्याला निलंबित केले होते. तसेच, त्याला तुरुंगातही जावे लागले होते. अशात नुकतेच त्याला न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे आणि क्रिकेट बोर्डानेही त्याच्यावर लावलेली बंदी हटवली आहे.
संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मैदानावर दमदार पुनरागमन केले आहे. संदीप सध्या क्रिकेट विश्वचषक लीग 2 (Cricket World Cup League 2) स्पर्धेत नेपाळकडून खेळत आहे. तसेच, त्याने त्याच्या फिरकी गोलंदाजीने विरोधी संघाच्या फलंदाजांना चिंतेत टाकले आहे. त्याने मंगळवारी (दि. 21 फेब्रुवारी) विश्वचषक लीग 2च्या एका सामन्यात स्कॉटलँडविरुद्ध दमदार कामगिरी केली आणि 10 षटकात 45 धावा खर्च करत 4 विकेट्स चटकावल्या.
#ODI #CWCL2 #VICTORY: Scotland 212 in 46.1 overs (G Munsey 60, M Cross 42, B McMullen 31, Lamichhane 4/45, Karan KC 3/42) lost to Nepal 213/8 in 44.1 overs (Rohit Paudel 95*, Karan KC 31*, G Malla 21, M Watt 3/29, C Greaves 2/61) by 2 wickets. MoM: Rohit Paudel
— Cricket Nepal (@NepalCricket) February 21, 2023
संदीपने तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर नेपाळसाठी पहिला सामना 14 फेब्रुवारी रोजी खेळला होता. त्या सामन्यात त्याने नामीबिया संघाविरुद्ध 66 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आणि संघाला 2 विकेट्सने विजय मिळवून दिला होता. यानंतर त्याने 3 सामने खेळले आहेत. तसेच, प्रत्येक सामन्यात 3 विकेट घेतले आहेत.
वयाच्या 18व्या वर्षी पदार्पण
संदीपची क्रिकेटपटू बनण्याची कहाणी खूपच रंजक आहे. त्याने वयाच्या 18व्या वर्षी नेपाळ संघाकडून पदार्पण केले होते. नेपाळचे तत्कालीन प्रशिक्षक पुबुद दसानायके यांची नजर संदीपवर तेव्हा पडली होती, जेव्हा तो 14वर्षांचा होता. खरं तर, दसानायके तेव्हा नेपाळ संघाच्या गोलंदाजाच्या लग्नासाठी जात होते. त्यादरम्यान वाटेत त्यांची गाडी खराब झाली होती. ते जिथे थांबले होते, तिथे संदीप त्यांना गोलंदाजी करताना दिसला.
प्रशिक्षकांना संदीपच्या गोलंदाजीमध्ये काहीतरी वेगळे दिसले. त्यानंतर या फिरकीपटूचे नशीबच बदलले. पुढच्याच वर्षी तो नेपाळ दौऱ्यावर आलेल्या एमसीसी संघाविरुद्ध खेळताना दिसला. तिथून त्याला हाँगकाँग टी20 लीगमध्ये खेळण्याचीही संधी मिळाली. या लीगमध्ये मायकल क्लार्कची नजर त्याच्यावर पडली. संदीप हाँगकाँगवरून थेट ऑस्ट्रेलियाला पोहोचला. तसेच, तिथे क्लब क्रिकेट खेळला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.
आयपीएल खेळणारा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू
संदीप सन 2016मध्ये नेपाळकडून 19 वर्षांखालील विश्वचषक खेळला आणि आपल्या देशासाठी सर्वाधिक विकेट्सचा घेतल्या. त्यानंतर आयपीएलमध्ये विकला जाणारा तो नेपाळचा पहिला क्रिकेटपटू बनला. त्यानंतर त्याने 2018मध्ये वनडे आणि टी20 पदार्पण केले. त्यानंतरपासून संदीप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. तसेच, अनेक देशांच्या लीग क्रिकेटमध्येही भाग घेत आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत 34 वनडेत 82 आणि 44 टी20त 85 विकेट्स आहेत. (nepals cricketer sandeep lamichhane rape accused and out on bail playing in cwc league 2)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलप्रेमींवर अंबानी मेहरबान! आता फुकटात पाहता येतील सर्व सामने, खर्च केलेत ‘एवढे’ बिलियन डॉलर्स
आयपीएल सुरु होण्यापूर्वीच बीसीसीआयचा मोठा निर्णय! स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील राजस्थानच्या खेळाडूला दिलासा