आयपीएल २०२० कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. परंतु, सध्या आयपीएलच्या आयोजनाची शक्यता दिसून येत आहे. आयपीएलमधील फ्रंचायझी किंग्स इलेव्हन पंजाबचे मालक नेस वाडिया यांचे म्हणणे आहे की, “जर आयपीएल झाले, तर टिव्हीवर दर्शकांचा एक नवा विक्रम बनू शकतो.”
“तसेच, फ्रंचायझींना बीसीसीआयकडून आयपीएलच्या भविष्याबाबतच्या अनेक प्रश्नांची निर्णायक उत्तरे हवी आहेत. जसे की, आयपीएलचा १३वा हंगाम पूर्ण खेळला जाईल का सामन्यांच्या संख्येत घट होईल? तसेच, आयपीएल मायदेशात होईल का परदेशात?”
गेल्या काही दिवसांपासून असे म्हटले जात आहे की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारा टी२० विश्वचषकासाठी १६ संघांची व्यवस्था करणे कठीण जाईल. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनाचे मार्ग खुले झाले आहेत.
नेस वाडिया पीटीआयशी बोलताना म्हणाले की, “सध्याच्या परिस्थितीला पाहता १६ संघांसह टी२० विश्वचषकाचे आयोजन करण्यासाठी अनेक समस्या निर्माण होत आहेत. आयपीएलचे नियोजनही सोपे नाही. आयपीएल अशा ठिकाणी खेळले गेले पाहिजे, जिथे मैदानावर आणि मैदानाबाहेर दोन्ही ठिकाणी योग्य सुविधा असाव्यात.”
आयसीसीने टी20 विश्वचषकाच्या आयोजनाचा अंतिम निर्णय जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलला आहे. परंतु, बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयपीएलचे आयोजन करण्याच्या तयारीला लागली आहे. पण विस्तारमध्ये काही सांगितलेले नाही.
कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वैंकी मैसूर यांनी मागच्या आठवड्यात एका मीडिया कार्यक्रमादरम्यान लीग स्वरुपाबाबत होणाऱ्या छेडछाडीला विरोध दर्शवला होता. पण आयपीएलच्या हितधारकांना ही गोष्ट मान्य नाही. या जागतिक महामारीदरम्यान छोट्या टूर्नामेंटचे आयोजन करण्यास त्यांची हरकत नाही.
वाडिया पुढे बोलताना म्हणाले की, “मला विश्वास आहे की पूर्ण आयपीएलचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. पण, कमी सामन्यांचे आयपीएल झाल्यासही आम्हाला काही हरकत नाही. कोविड-१९च्या स्थितीनुसार योग्य योजना करावी लागेल. २००९मध्ये दक्षिण आफ्रिकामध्ये आम्ही फक्त एका महिन्यासाठी आयपीएल आयोजले होते.”
ट्रेंडिंग घडामोडी-
‘ते’ असे एक कारण, ज्यामुळे विराट आहे रोहितपेक्षा भारी
पहा व्हिडिओ- २१ वर्षांपूर्वी झाला होता क्रिकेट विश्वचषकातील सर्वात…
टी२० विश्वचषकात टीम इंडियाकडून फायनल की आयपीएलमध्ये मुंबईकडून फायनल?…