fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पहा व्हिडिओ- १९ वर्षांपूर्वी झाला होता क्रिकेट इतिहासातील सर्वात रोमांचकारी सामना

19 वर्षांपूर्वी 17 जून 1999ला विश्वचषकात आॅस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात उपांत्य फेरीचा  रोमांचकारी सामना पार पडला होता. या सामन्याच्या अखेरच्या क्षणी आलेल्या नाट्यपूर्ण वळणामुळे तो सर्वांच्याच लक्षात राहिला.

आत्तापर्यंत झालेल्या विश्वचषकातील सामन्यापैकी तो सामना सर्वाधिक रोमांचकारी आणि अटीतटीचा झाला होता. तो सामना विकेट, धावा अशा सगळ्याच दृष्टीने बरोबरीचा ठरला.

मात्र अखेरच्या क्षणी द. आफ्रिकेचा अॅलन डोनाल्ड धावबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेकडे आंतिम सामन्यात प्रवेश करण्याची चालुन आलेली संधी अखेरच्या क्षणी गमवावी लागली. त्यामुळे आॅस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात स्थान मिळवत विजेतेपदही मिळवले.

द. आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करताना आॅस्ट्रेलियाला 49.2 षटकात 213 धावांवर सर्वबाद केले होते. त्यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर फॉर्ममध्ये असलेल्या लान्स क्लुसनर दोन चौकार ठोकत सामना द. आफ्रिकेकडे झुकवला.

त्यावेळी द. आफ्रिका 49.2 षटकात 9 बाद 213 धावा अशा स्थितीत होता. खेळपट्टीवर त्या विश्वचषकात मालिकावीर ठरलेला क्लुसनर आणि डोनाल्ड होते. क्लुसनर 31धावांवर नाबाद होता.

द.आफ्रिकेला विजयासाठी फक्त एका धावेची गरज आसताना या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नॉन स्ट्रायकर एन्डला असलेला डोनाल्ड धावबाद होता होता वाचला. परंतू पुढच्याच चेंडूवर पुन्हा एकदा धावबादचे नाट्य रंगले.

डॅमियन फ्लेमिंग टाकलेल्या यॉर्करवर क्लुसनरने सरळ फटका खेळला आणि धाव घेण्यासाठी तो धावला मात्र डोनाल्डचे त्याकडे लक्ष गेले नाही. अखेर डोनाल्डच्या हातुन बॅट निसटल्याने तो क्लुसनरला पाहुन धाव पूर्ण करण्यासाठी पळाला. पण तोपर्यंत चेंडू यष्टीरक्षक अॅडम गिलख्रस्टच्या हातात आला होता. त्याने डोनाल्डला धावबाद करत द. आफ्रिकेचे पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न संपुष्टात आणले.

द. आफ्रिकेसाठी आणि संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ करणाऱ्या क्लुसनरसाठी हा क्षण खुप कठीण होता. त्याबद्दल बोलताना क्लुसनरने सांगितले, “मी माझ्यावरच नाराज होतो. मला थोडा संयम ठेवायला पाहिजे होता.

पण, मला वाटते हे एक चांगले विज्ञान आहे.आपण नेहमीच ‘आम्ही जर वाट पाहिली असती तर’ किंवा जे काही म्हणू, पण ते शेवटचे दोन चेंडू उत्तम यॉर्कर्स होते आणि आम्ही म्हणत बसलो की ‘आम्ही आधीच संधीचा फायदा घ्यायला हवा होता'”

तसेच आॅस्ट्रेलियाकडून शेवटचे षटक टाकणारे आणि डोनाल्डला धावबाद करणारे डॅमियन फ्लेमिंग म्हणाला, “चौथ्या चेंडूवर मी अखेर योग्य यॉर्कर टाकला. माझ्या चांगले लक्षात आहे,  क्लुसनर धाव घेण्यासाठी धावत होता आणि डोनाल्डला कुठे पळावे याची खात्री नव्हती.”

तो पुढे म्हणाला त्याक्षणीच्या आनंदासाठीच तुम्ही क्रिकेट खेळता.

क्रिकेटवरील भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालिकेतील खास लेख:

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा

वाचा-

मुंबई क्रिकेट सफरनामा भाग ३- मुंबई क्रिकेट कार्निवल- पंचरंगी स्पर्धा

महत्त्वाच्या बातम्या:

त्या व्हिडिओमुळे विराट कोहली-अनुष्का शर्मा अडचणीत

विंडिज विरुद्ध श्रीलंका कसोटीत रंगले नाट्य; श्रीलंका खेळाडूंचा खेळायला येण्यास नकार

हा मोठा खेळाडू म्हणतो अफगाणिस्तानला अजून वेळ दिला पाहिजे!

You might also like