वर्ष २०१९ च्या अखेरीस जागतिक महामारी, कोविड-१९ ने आपले पाय पसरले होते, ज्याचा परिणाम क्रिडाजगतावरही झाला होता. या महामारीमुळे जवळपास फेब्रुवारी २०२० पर्यंत क्रिडा क्षेत्र ठप्प होते. क्रिडाक्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रांनाही कोरोनाचा फटका सहन करावा लागला होता. यामुळे क्रिडाविश्वाची आर्थिक स्थिती ढासळली होती. फुलबॉल, क्रिकेट, टेनिस, बास्केटबॉल, हॉकी, बॅडमिंटन अशा खेळासी संबंधित प्रत्येक बोर्ड, फ्रँचायझी, क्लब आणि खेळाडूंनाही मोठ्या प्रणामात आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले होते.
परंतु आता क्रिडाक्षेत्र पूर्वपदावर आले आहे. त्यातही नुकतीच नवीन वर्षाचीही सुरुवात झाली आहे. हे नवे वर्ष अर्थातच २०२२ क्रिडाक्षेत्रासाठी नव्या संधी, नवी सुरुवात घेऊन आले आहे. बऱ्याचशा क्रिडापटूंना या वर्षात भरपूर मानधन लाभ होणार आहे. येथे २०२२ च्या जगातील सर्वात श्रीमंत ऍथलिट्सचा आढावा घेण्यात आला आहे.
‘वेल्दी गोरिल्ला’ने या वर्षातील ३० सर्वात श्रीमंत ऍथलिट्सची यादी जाहीर केली आहे. २०२२ मधील जगातील सर्वात श्रीमंत ऍथलिट्सविषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये अमेरिकेचा दिग्गज बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डन हा अव्वलस्थानी आहे. तो २.२ बिलियन डॉलर अर्थात १६,३४१ कोटी रुपयांसह या वर्षांतील सर्वात श्रीमंत ऍथलिट बनला आहे. तर स्टार गोल्फपटू टायगर वुड या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
तसेच प्रसिद्ध फुटबॉलपटू लियोनल मेस्सी याने ख्रिस्टियानो रोनाल्डोला मागे सोडले आहे. मेस्सी फुटबॉलविश्वातील सर्वात श्रीमंत खेळाडू बनला आहे. एकूणच पाहायचे झाल्यास, तो आठव्या आणि रोनाल्डो १२ व्या क्रमांकावर आहेत. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे, या यादीत एकाची क्रिकेटपटूचा मात्र समावेश नाही.
वर्ष २०२२ चे ३० सर्वात श्रीमंत ऍथलिट्स (Richest athletes in the world 2022)-
१. माइकल जॉर्डन (बास्केटबॉल)- २.२ बिलियन
२. विन्से मैकमोहन (डब्ल्यूडब्ल्यूई)- १.६ बिलियन
३. आयन टिरिऍक (टेनिस)- १.२ बिलियन
४. एना कास्प्रेक (घोडस्वारी)- १ बिलियन
५. टाइगर वुड (गोल्फ)- ८०० मिलियन
६. इदी जॉर्डन (एफ १)- ६०० मिलियन
७. जूनियर ब्रिजमैन (बास्केटबॉल)- ६०० मिलियन
८. लियोनल मेस्सी (फुटबॉल)- ६०० मिलियन
९. मैजिक जॉनसन (बास्केटबॉल)- ६०० मिलियन
१०. माइकल शूमाकर (एफ १)- ६०० मिलियन
११. रोजर स्टुबाक (अमेरिकन फुटबॉल)- ६०० मिलियन
१२. ख्रिस्टियानो रोनाल्डो (फुटबॉल)- ५०० मिलियन
१३. लेब्रॉन जेम्स (बास्केटबॉल)- ५०० मिलियन
१४. डेविड बैकहम (फुटबॉल)- ४५० मिलियन
१५. फ्लॉयड मेयवेदर (बॉक्सिंग)- ४५० मिलियन
१६. रोजर फेडरर (टेनिस)- ४५० मिलियन
१७. ग्रेग नॉर्मन (गोल्फ)- ४०० मिलियन
१८. जैक निकलॉस (गोल्फ)- ४०० मिलियन
१९. फिल मायकलसन (गोल्फ)- ४०० मिनियन
२०. फिल शैकिले ओ’नील (बास्केटबॉल)- ४०० मिलियन
२१. ड्वेन जॉनसन (द रॉक) (डब्ल्यूडब्ल्यूई)- ४०० मिलियन
२२. विनी जॉनसन (बास्केटबॉल)- ४०० मिलियन
२३. ऍलेक्स रोड्रिग्ज (बास्केटबॉल)- ३५० मिलियन
२४. डेल अर्नहार्ट जूनियर (NASCAR)- ३०० मिलियन
२५. जॉर्ज फॉर्मन (बॉक्सिंग) – ३०० मिलियन
२६. लुईस हैमिल्टन (एफ १)- २८५ मिलियन
२७. फर्नांडो अलोंसो (एफ १)- २६० मिलियन
२८. गैरी प्लेयर (गोल्फ)- २६० मिलियन
२९. ग्रांट हिल (बास्केटबॉल)- २५० मिलियन
३०. किमी रीकोनेन (एफ १)- २५० मिलियन
महत्त्वाच्या बातम्या-
झुलन गोस्वामीच्या भूमीकेत अनुष्का शर्माचा जलवा! ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
पंतशी पंगा, मग होणार दंगा! एडेन मार्करमच्या स्लेजिंगला रिषभचे सडेतोड उत्तर, पाहा व्हिडिओ
SAvsIND, 2nd Test, Live: चौथ्या दिवशी पावसाचा अडथळा; खेळ सुरू होण्यास विलंब
हेही पाहा-