---Advertisement---

बाबर आझमचं टेन्शंनं वाढलंय! पाकिस्तानला धुळ चारण्यासाठी ‘या’ देशाने जाहिर केलाय मजबूत संघ

On: रविवार, ऑगस्ट 14, 2022 6:05 PM
Pakistan-Cricket-Team
---Advertisement---

नेदरलंड क्रिकेटने पाकिस्तान संघाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी त्यांचा १५ सदस्यांचा संघ घोषित केला आहे. नेदरलंडचे नेतृत्व स्कॉट एडवर्ड्स करणार आहे. तर दुसरीकडे यूकेमध्ये स्थित सात खेळाडू द हंड्रेड  आणि वनडे कप खेळत असल्यामुळे ते राष्ट्रीय संघाला सेवा देण्यासाठी उपलब्ध राहू शकले नाहीत. या मालिकेतून नेदरलंडसाठी एक युवा अष्टपैलू खेळाडू पदार्पण करणार आहे.

पाकिस्तान संघाला या नेदलंड दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. मालिकेत तिन्ही सामने रॉटरडॅममध्ये खेलले जातील. पहिला सामना १६ ऑगस्ट रोजी खेळला जाईत, तर पुढचे दोन सामने अनुक्रमे १८ आणि २१ ऑगस्ट रोजी खेळले जातील. नेदरलंडचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वेस्ली बरेसी या मालिकेतून संघात पुनरागमन करणार आहे. बेरेसीने राष्ट्रीय संघासाठी शेवटचा सामना २०१९ मधील जून महिन्यात खेळला होता. तसेच युवा अष्टपैलू खेळाडू अर्नव जैन याने नेदरलंडच्या राष्ट्रीय संघासाठी पहिल्यांदाच खेळणार आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला नेदरलंड संघ –
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/ यष्टीरक्षक फलंदाज), मैक्स ओ’डॉड, विक्रम सिंह, मूसा नदीम अहमद, टॉम कूपर, बास डी लीड, वेस्ले बर्रेसी, तेजा निदामनुरु, लोगान वैन बीक, टिम प्रिंगल, आर्यन दत्त, रयान क्लेन, विवियन किंगमा। शारिज अहमद, अर्नव जैनी.

नेदरलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाटी निवडलेला पाकिस्तान पाकिस्तान संघ – 
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हारिस रउफ, इमाम-उल-हक, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक फलंदाज), मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, सलमान अली आगा, शाहीन शाह अफरीदी, शाहनवाज दहानी, जाहिद महमूद.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

‘विराट कोहली टायगर वुड्स सारखा आहे’, सलग २ शतके झळकावणाऱ्या झिम्बाब्वेच्या खेळाडूने केले कौतुक

आशियाच्या रणांगणात ‘हे’ आहेत भारताचे ‘सिक्सर किंग’! दोन झाले रिटायर तर एकाला मोठी संधी

झिम्बाब्वेचा धुव्वा उडवायला पोहोचलाय भारतीय संघ! पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---