विश्वचषक 2023 स्पर्धेत 40 वा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे खेळला गेला. या सामन्यात गतविजेता इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स संघ आमने-सामने आले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने 339 धावा उभारल्या. त्याचवेळी नेदरलँड्सचा युवा अष्टपैलू बास डी लिडे याने विश्वचषकातील आपल्याच वडिलांच्या एका विक्रमाची बरोबरी केली.
या सामन्यात इंग्लंड संघाने उत्कृष्ट फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली. नेदरलँड्स संघासाठी अष्टपैलू बास डी लिडे याने सर्वाधिक तीन बळी मिळवले. यासह त्याने एका विश्वचषकात नेदरलँडसाठी सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये पहिले स्थान कमावले. त्याने केवळ 8 सामन्यांमध्ये 14 बळी मिळवत पहिल्या स्थानावर झेप घेतली. विशेष म्हणजे त्याने आपलेच वडिल टीम डी लिडे यांच्या 14 सामन्यातील 14 बळींची ही बरोबरी केली. या यादीमध्ये सध्या संघात असलेले लोगन वॅन बिक व पॉल मिकरेन हे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत. त्यांनी प्रत्येकी 11 बळी मिळवले आहेत.
Most wickets for Netherlands in ODI World Cup:
14 – Tim de Leede
14 – Bas de LeedeBoth have a World Cup four-fer.
Both have a World Cup fifty.
Like father, like son.#CWC2023 #ENGvsNED pic.twitter.com/i7jlBzjmkr— Kausthub Gudipati (@kaustats) November 8, 2023
बास डी लिडे याने या विश्वचषकात यापूर्वी देखील असे काही विक्रम केले आहे जे त्याच्या वडिलांनी देखील करून दाखवले होते. त्याने पाकिस्तानविरुद्ध चार बळी मिळवले होते. त्याच्या वडिलांनी 2003 विश्वचषकात भारताविरुद्ध अशी कामगिरी केली होती. तसेच या पिता-पुत्रांच्या नावे विश्वचषकात अर्धशतके देखील जमा आहेत.
बास याच्याकडे या विश्वचषकात आपल्या वडिलांचा सर्वाधिक बळींचा विक्रम मोडण्याची आणखी एक संधी असेल. नेदरलँड्स विश्वचषकातील आपला अखेरचा साखळी सामना भारताविरुद्ध खेळणार आहे. त्यावेळी तो ही कामगिरी करू शकतो.
(Netherlands Bass De Leede Eqauals Father Tim De Leede Record In ODI World Cup)
हेही वाचा-
सत्ता आपलीच! नव्या गोलंदाजी क्रमवारीत टीम इंडियाचा पूर्ण तोफखाना ‘टॉप 10’मध्ये! सिराज पुन्हा नंबर वन
हा वर्ल्डकप विक्रमांचा! 48 वर्षांच्या इतिहासात कुठल्याच हंगामात न घडलेला रेकॉर्ड CWC 2023मध्ये घडला, वाचाच