भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर विक्रम रचला. त्याने वनडे कारकीर्दीतील 49वे शतक झळकावले. यामुळे त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. यानंतर आता पाकिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद हाफीज याने विराटविषयी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, विराट त्याच्या शतकासाठी खेळत होता. त्याने असेही म्हटले की, विराटने संघाचा विचार न करता शतक करण्याचा विचार केला. आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने हाफीजला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
विराटचे शतक
विराट कोहली (Virat Kohli) याने विश्वचषक 2023 (IPL 2023) स्पर्धेत रविवारी (दि. 05 नोव्हेंबर) 35व्या वाढदिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 121 चेंडूत नाबाद 101 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या खेळीत 10 चौकारांचा समावेश होता. हे विराटचे वनडे कारकीर्दीतील 49वे शतक होते. यासह विराटने सचिन तेंडुलकर याच्या 49 शतकांच्या विक्रमांची बरोबरी केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तरीत्या अव्वलस्थानी विराट आणि सचिनचे नाव आहे.
मोहम्मद हाफीजची टीका
विराटच्या शतकाबद्दल पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद हाफीज (Mohammad Hafeez) याने टीका केली. त्याने म्हटले की, विराटने अखेरच्या षटकांमध्ये वेगाने फलंदाजी केली नाही आणि एक धाव घेऊन फक्त शतक पूर्ण करण्याचा विचार केला. एका टीव्ही चॅनेलसोबत बोलताना त्याने म्हटले, “मी पाहिले आहे की, विराट कोहली फक्त स्वत:साठी खेळत होता आणि या विश्वचषकात असे तिसऱ्यांदा झाले आहे. 49व्या षटकात तो एकेरी धाव घेत होता, जेणेकरून त्याचे शतक पूर्ण होऊ शकेल. त्याने संघाला प्राधान्य दिले नाही, जे माझ्या हिशोबाने योग्य नाहीये.”
मायकल वॉनचे प्रत्युत्तर
मोहम्मद हाफीज याच्या वक्तव्यावर मायकल वॉन यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स (ट्वीट) करत म्हटले की, “कम ऑन मोहम्मद हाफीज, भारताने या विश्वचषकात शानदार क्रिकेट खेळत 8 संघांना हरवले आहे. विराट कोहलीचे आता 49 शतके झाले आहेत. अखेरच्या सामन्यादरम्यान तो संथ खेळपट्टीवर मोलाची भूमिका बजावत होता. त्याच्या संघाने 200 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवला आहे. हा खूपच मूर्खपणा आहे.”
https://twitter.com/MichaelVaughan/status/1721720623465107644?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1721720623465107644%7Ctwgr%5E8024aef3a66f2f25b7788884ba514f9143d51a3d%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Fmichael-vaughan-slams-mohammad-hafeez-for-criticizing-virat-kohli
विराटची स्पर्धेतील कामगिरी
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने स्पर्धेत आतापर्यंत 8 सामने खेळेले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 108.60च्या सरासरीने 543 धावा निघाल्या आहेत. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा क्विंटन डी कॉकनंतरचा (550) दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. नाबाद 103 ही विराटची स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. (english former captain michael vaughan slams mohammad hafeez for criticizing virat kohli)
हेही वाचा-
बांगलादेश संघाला मोठा झटका! कर्णधार शाकिब वर्ल्डकपमधून बाहेर, धक्कादायक कारण आले समोर
ब्रेकिंग! विश्वचषक 2023 चालू असतानाच श्रीलंका क्रिकेट बोर्ड सस्पेंड, ‘या’ कारणामुळे उचलले मोठे पाऊल