आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 38वा सामना सोमवारी (दि. 06 नोव्हेंबर) बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात पार पडला. हा सामना बांगलादेश संघाने 3 विकेट्सने जिंकला. अशातच आता बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार शाकिब अल हसन विश्वचषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. शाकिब दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. याविषयी आयसीसी बोर्डाने माहिती दिली आहे.
शाकिब स्पर्धेतून बाहेर
बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन विश्वचषक 2023 (Shakib Al Hasan ruled out of CWC 2023) स्पर्धेतून बाहेर पडला. कारण, शाकिबला डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. शाकिबला ही दुखापत दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना झाली.
🚨 JUST IN: Bangladesh's star player has been ruled out of their final #CWC23 match against Australia!
Details 👇https://t.co/ae0wgYT9Xi
— ICC (@ICC) November 7, 2023
सामन्यानंतर करण्यात आलेल्या एक्सरेमध्ये याची पुष्टी झाली की, शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे तो बांगलादेश संघाच्या विश्वचषकातील अखेरच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 11 नोव्हेंबर रोजी पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे विश्वचषक 2023 स्पर्धेचा 43वा सामना खेळला जाणार आहे. (captain Shakib Al Hasan has been ruled out of the remain of CWC 2023 due to a finger injury)
शाकिबच्या दुखापतीविषयी फिजिओची माहिती
बांगलादेश संघाचे फिजिओ बेजेदुल इस्लाम खान यांनी शाकिबच्या दुखापतीबाबत अधिक माहिती दिली. त्यांनी म्हटले की, “डावाच्या सुरुवातीला शाकिबच्या डाव्या हाताच्या तर्जनीला मार लागला होता, पण त्याने सपोर्टिव्ह टेपिंग आणि पेनकिलरसह फलंदाजी सुरू ठेवली.”
त्यांनी पुढे बोलताना म्हटले की, “खेळानंतर त्याचा दिल्लीत इमर्जन्सी एक्स-रे घेण्यात आला, ज्यामध्ये त्याच्या डाव्या पीआयपी जॉइंटवर फ्रॅक्चर झाल्याची पुष्टी केली. त्याला बरे होण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे रिहॅब सुरू करण्यासाठी तो आज बांगलादेशला रवाना होईल.”
शाकिबची विजयी खेळी
श्रीलंका संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात 279 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने 41.1 षटकात 7 विकेट्स गमावत 282 धावा केल्या. यावेळी बांगलादेशकडून चौथ्या क्रमांकावर खेळताना शाकिब अल हसनने 65 चेंडूत 82 धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये 2 षटकार आणि 12 चौकारांचाही समावेश होता. याव्यतिरिक्त शाकिबने गोलंदाजी करताना 10 षटकात 57 धावा खर्च करत 2 विकेट्सही घेतल्या होत्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
हेही वाचा-
ब्रेकिंग! विश्वचषक 2023 चालू असतानाच श्रीलंका क्रिकेट बोर्ड सस्पेंड, ‘या’ कारणामुळे उचलले मोठे पाऊल
वानखेडेवर अफगाणी कर्णधाराने जिंकला टॉस, करणार पहिली बॅटिंग; कमिन्ससेनेतून 2 हुकमी एक्के बाहेर