श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना चाहत्यांसाठी एक मेजवानी ठरला. अँजेलो मॅथ्यूज आणि शाकिब अल हसन यांच्यातील घमासान सोमवारी (6 नोव्हेंबर) पाहायला मिळाले. बांगलादेशने या सामन्यात 3 विकेट्स राखून विजय मिळवला. सामना संपल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने मॅथ्यूजला बाद करण्यासाठी केलेल्या अपीलबाबत मत मांडले.
अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नाटकिय पद्धतीने विकेट गमावली. श्रीलंकेच्या डावातील 25व्या षटकात सदिरा समरविक्रमा याने विकेट गमावली आणि अँजेलो मॅथ्यूज खेळपट्टीवर आला. मात्र, खेळपट्टीवर आल्यानंतर त्याने सोबत आणलेले हेलमेट तुडलेले होते, हे समजले. याच कारणास्तव शाकिबला नियमानुसार पहिल्या तीन मिनिटांमध्ये खेळी सुरु करता आली नाही. विरोधी संघाचा कर्णधार या नात्याने शाकिब अल हसन याने मात्र संधी साधली आणि मॅथ्यूजविरोधात अपील केली. शाकिबच्या अपीलनंतर पंचांना देखील मॅथ्यूजला बाद घोषित करावे लागले. नियमानुसार शाकिब चुकीचा नाही, पण खेळाडू वृत्ती न दाखवल्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे.
याच पार्श्वभूमीवर सामना संपल्यानंतर त्याला याबाबत प्रश्न विचारला गेला. त्याने यावेळी असाही मॅथ्यूज आणि त्याच्यात झालेल्या चर्चेचा खुलासाही केला. शाकिबने सांगितले की, “तो (मॅथ्यूज) माझ्या जवळ आला आणि म्हणाला, माझी इच्छा असेल तर तू तुझी अपील मागे घेशील की नाही. मी म्हणालो, तुलाही हे माहीत आहे की, मी तुझी परिस्थिती समजू शकतो. पण मी अपील मागे घेणार नाही. हा नियम आहे की, फलंदाज ठराविक वेळेत खेळपट्टीवर उपस्थित पाहिजे. पण तो खेळण्यासाठी वेळेत तयार नव्हता.”
दरम्यान, श्रीलंकेच्या डावात शाकिबने चालाकीहने केलेली अपील श्रीलंकेला नक्कीच महागात पडला. मॅथ्यूज संघ अडचणीत असताना एकाही धावेचे योगदान देऊ शकला नाही. पण मॅथ्यूजनेही गोलंदाजी करताना शाकिबची विकेट नावावर केली. बांगलादेशच्या डावातील 32व्या षटकात मॅथ्यूजने शाकिबला चरिथ असलंका याच्या हातात झेलबाद केले.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 49.3 षटकात 279 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश संघ 41.1 षटकांमध्ये 280 धावांचे लक्ष्य गाठले. श्रीलंकेसाठी हा विस्वचषक हंगामातील सहावा पराभव ठरला, तर बांगलादेससाठी दुसरा विजय ठरला. हे दोन्ही संघ गुणतालिकेत अनुक्रमे आठ आणि सात क्रमांकावर आहेत. (Ashiq Al Hasan reacts to Angelo Mathews’ wicket and appeal)
महत्वाच्या बातम्या –
श्रीलंका-बांगलादेशच्या खेळाडूंनी लावला ‘जेंटलमन्स गेम’ला डाग! सामन्यानंतर केली नकोशी कृती
CWC 2023: अखेर बांगलादेशचाच नागिण डान्स! श्रीलंका वर्ल्डकपमधून ‘आऊट’