वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 38वा सामना सोमवारी (6 नोव्हेंबर) बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात खेळला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चांगला संघर्ष पाहायला मिळाला. रोमहर्षक झालेल्या या सामन्यात बांगलादेशने तीन गडी राखून विजय मिळवला. मात्र, सामना संपल्यानंतर दोन्ही संघांनी हात मिळवली न केल्याने नवी चर्चा सुरू झाली.
First time i witnessed A cricket match without handshakes at the end
No Handshakes between Sri Lanka and Bangladesh players 🤝#SLvsBAN #BANvsSL #SLvBAN@ICC @BCBtigers @SriLankaTweet pic.twitter.com/sivr2UP7pB
— Navaneet (@navneetn7) November 6, 2023
मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याकडे पाहिले जाते. या सामन्यात श्रीलंका संघ फलंदाजी करत असताना ऍंजेलो मॅथ्यूज याला टाईम पद्धतीने बांगलादेश संघाने बाद केले होते. त्यामुळे या सामन्यातील गरमागरमी आणखीच वाढली. बांगलादेश संघाच्या फलंदाजी दरम्यान देखील श्रीलंकेचे खेळाडू सातत्याने बांगलादेशच्या खेळाडूंना डिवचताना दिसले. या सामन्यानंतरही दोन्ही संघातील हीच गरमी कायम राहिली.
सामना संपल्यानंतर क्रिकेटमध्ये नेहमीच दोन्ही संघातील खेळाडू व सपोर्ट स्टाफ एकमेकांशी हातमिळवणी करत असतात. मात्र, या सामन्यानंतर असे घडले नाही. दोन्ही संघातील खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांनी एकमेकांशी हात मिळवण्यास चक्क नकार दिला व ते आपापल्या ड्रेसिंग रूमकडे निघून गेले. या गोष्टीची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे.
या सामन्याचा विचार केल्यास बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेच्या प्रमुख फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही ते मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. मात्र, चरिथ असलंका याने शानदार शतक ठोकत श्रीलंकेला 279 पर्यंत पोहोचवले. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने नजमुल हसन शांतो व कर्णधार शाकिब अल हसन यांच्या अर्धशतकामुळे तीन गडी राखून विजय मिळवला.
(No Customery Handshake Between Srilanka And Bangladesh Players In ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
रियान परागला भेटणार टीम इंडियात संधी? ‘या’ दिवशी करणार आंतरराष्ट्रीय पदार्पण
Timed Out । शाकिबनेच दाखवला स्वार्थीपणा! दिग्गजाने सांगितला मैदानात घडला प्रकार